Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजगदीप धनखड भारताचे नवे उपराष्ट्रपती

जगदीप धनखड भारताचे नवे उपराष्ट्रपती

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक (Vice President Election) आज झाली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे (NDA) उमेदवार माजी राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) होते . तर विरोधकांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना उमेदवारी दिली होती.मतमोजणी नंतर NDA चे उमेदवार जगदीप धनखड हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

- Advertisement -

आकडेवारीचा विचार करता लढतीत भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभेत सर्वाधिक जागा असल्याने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल धनखड यांचा विजय निश्चित दिसत होता .NDA चे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखड यांना ५८२ मते मिळाली तर विरोधीपक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली. दरम्यान उपराष्ट्रपतीपदाच्या निवणुकीत १५ मते बाद झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या