Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या'बिबट्या'च्या पिंजऱ्यात जेरबंद झाला कोल्हा...

‘बिबट्या’च्या पिंजऱ्यात जेरबंद झाला कोल्हा…

उजणी | राम सुरसे‌

‌सिन्नर तालुक्यातील उजणी येथे गोसावी बाबा मंदिर परीसरात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याचा संचार दिसून येत आहे. बिबट्याने परिसरातील शेतकऱ्यांचे पाळीव प्राणीदेखील फस्त केल्याच्या काही घटना घडल्या आहेत….

- Advertisement -

याप्रश्वभूमीवर या भागात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत याठिकाणी संचार असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावलेला होता. परंतु गेल्या चार दिवसांत याठिकाणी बिबट्या जेरबंद झालेला नाही.

मात्र, रात्री एका कोल्हयाने अचानक या पिंजऱ्यात प्रवेश केला. यानंतर पिंजऱ्याचा दरवाजा आपोआप बंद झाला. यानंतर सकाळी उठलेले शेतकरी सुनिल दवंगे व मजुर सिताराम आहेर पिंजऱ्याचा दरवाजा बंद असल्याचे बघून बिबट्या बंद झाला असावा या उद्देशाने पिंजरयाकडे कूच केली. परंतु पिंजऱ्यात बिबट्या नाही तर कोल्हा निपचित पडलेला दिसून आला.

यानंतर कोल्हयाला पिंजऱ्यातून बाहेर काढले. कुई-कुई करून कोल्हा मरण पावला असावा असे काहींना वाटले. त्यांनी कोल्हयाच्या तोंडावर पाणी मारले. तरीदेखील कोल्हयाला जाग आली नाही. यानंतर परिसरातील नागरिक वनविभागाला याबाबत माहिती देणारच होते तेवढ्यात कोल्ह्याने घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

- Advertisment -

ताज्या बातम्या