Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याJ P Nadda : जे. पी. नड्डांचा भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवला

J P Nadda : जे. पी. नड्डांचा भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवला

दिल्ली | Delhi

भाजप अध्यक्ष जे पी नड्डांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नड्डा यांना मुदतवाढ दिली गेल्याची माहिती दिली.

- Advertisement -

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ दुसऱ्या कुणाच्या गळ्यात पडणार का? याची चर्चा सुरू होती. मात्र तसं घडलेलं नाही. जे. नड्डा हे जून २०२४ पर्यंत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत.

भाजपच्या इतिहासात पक्षाचे पहिले अध्यक्ष दिवंगत अटलबिहारी वाजपेयी सोडले तर राष्ट्रीय अध्यक्षांना सलगपणे मुदतवाढ मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी नितीन गडकरी अध्यक्ष असताना, संघनेतृत्वाच्या इच्छेनुसार पक्षाध्यक्षांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत भाजपने घटनादुरुस्ती केली होती. त्याचा फायदा आता नड्डा यांना अनपेक्षितरित्या झाल्याचे दिसते.

पक्षाध्यक्षांचा कार्यकाळ वाढवण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या 9 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये मे ते जूनदरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे. जेपी नड्डा यांच्या नावावर कोणत्याही कारणाने एकमत झाले नाही, तर भूपेंद्र यादव यांचे नाव शर्यतीत आघाडीवर होते. त्याचबरोबर गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनाही केंद्रात महत्त्वाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या