Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशए मेरे वतन के लोगों...! ITBP जवानाने लता मंगेशकर यांना वाहिली अनोखी...

ए मेरे वतन के लोगों…! ITBP जवानाने लता मंगेशकर यांना वाहिली अनोखी श्रद्धांजली, पाहा VIDEO

मुंबई | Mumbai

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आज सकाळी ८.१२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

करोना आणि न्यूमोनिया झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 28 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरू होते.

Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार

लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ‘ए मेरे वतन के लोगों’ या गाण्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका ITBP जवानाने भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांच्या खास शैलीत श्रद्धांजली वाहिली आहे.

Lata Mangeshkar : जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या.

लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते. लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते.

‘लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशाचे वैभव हरपले’

लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या