गुणवंत शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे - डॉ.पवार

गुणवंत शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे - डॉ.पवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील शिक्षकांनी पोटच्या मुलांपेक्षाही आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची काळजी घेत करोना काळात हेल्थ वॉरियर यांच्या बरोबरीने काम केले आहे.त्यामुळे अशा शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली जावी,याकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे (Education Department of Zilla Parishad Nashik ) दरवर्षी दिल्या जाणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्कारांच्या ( Teachers Award )संख्येत वाढ करण्यात यावी,अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar)व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Deputy Speaker of Legislative Assembly Narahari Jhirwal)यांनी केली.

जिल्हा परिषदेतर्फे सन 2020-21 व 2021-22 या दोन्ही शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा येथील प.सा.नाट्यगृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या,शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल जनजागृती करावी.जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयार करावे,असे सांगत नाशिक जिल्ह्यातील शाळांसाठी शाळा व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाने ४० कोटी रुपयांच्या सीएसआर निधी मिळवला याबद्दल कौतुक केले.शिक्षकांना शाळाबाह्य कामे जास्त प्रमाणात असतात. पण हे सर्व सांभाळून शिक्षक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडवण्याचे काम करतात. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळाले तर, त्यांचा सर्वांगिण विकास होतो. काळासोबत हिंदी व इंग्रजी भाषाही त्यांना शिकवली तर जगात भारताचे नाव अधिक उंचावेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी आपल्या खास शैलित भाषण केले. शिक्षकांच्या बदल्यांविषयी त्यांनी ‘अवघड’ क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली. गुरुविना ज्ञान नाही. त्यामुळे शिक्षकांना आम्ही काय शिकवणार. इतर ठिकाणी हातवारे करुन आम्ही काही बोलू शकतो, पण शिक्षकांसमोर बोलण्याची आवश्यकता नाही.करोना काळात जिल्ह्यातील शिक्षकांनी चांगले काम केले. संपूर्ण जिल्ह्याचा विस्तार बघता आदर्श शिक्षक पुरस्कारांची संख्या ही देखील वाढवण्यात यावी असे सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल शिक्षण तज्ज्ञ सचिन जोशी यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोविड काळात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही, असे सांगत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा,यासाठी बँड पथक, गीत मंच स्थापन करण्यात आला आहे.पुढील काळात जिल्हा परिषद शाळांतील उत्कृष्ठ खेळाडूंची माहिती घेऊन त्यांच्यासाठी बाह्य प्रशिक्षकांकडून खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा पवार,शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, शिक्षणाधिकारी मच्छिन्द्र कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांच्यासह शिक्षक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सेवकांनी परिश्रम घेतले.

या शिक्षकांचा झाला सन्मान

शैक्षणिक वर्ष २०२०-२१

शशिकांत काशिनाथ शिंदे, मंजुषा बबन लोखंडे, स्वाती केशव शेवाळे, नितीन कौतिक देवरे, कैलास यादव शिंदे, देविदास मिला मोरे, सर्जेराव रावजी देसले, संदिप कडू हिरे, जयंत रामचंद्र जाधव, निलेश नारायणराव शितोळे, प्रमोद वसंत अहिरे, विजय तुकाराम निरगुडे, हरेराम मोहन गायकवाड, रविंद्र गंगाराम लहारे, संदिप जगन्नाथ वारुळे

शैक्षणिक वर्ष २०२१-२२

दिनेश रघुनाथ सोनवणे, हेमंत शांताराम बधान, वृषाली भिला देसले, जयदीप नामदेव गायकवाड, जयवंत हरिश्चंद्र पवार, माधुरी केवलराम पाटील, सुनील त्रिंबक पवार, नलिनी बन्सीलाल आहिरे, चेतन दत्तात्रय अहिरराव, राजेंद्र नारायण पाटील, देवदत्त हरी चौधरी, ज्योती रामनाथ कदम, मोतीराम भगवान भोये, अनिल रमेश महाजन, उज्वला अरुण सोनवणे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com