आयटी हब, लॉजिस्टिक पार्क प्रकल्प सल्लागाराविना

सत्तांतर झाल्याने कामे मार्गी लागण्याची आशा
आयटी हब, लॉजिस्टिक पार्क प्रकल्प सल्लागाराविना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गत पाच वर्षे नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची ( BJP) सत्ता होती. त्यामुळे माजी महापौर सतीश कुलकर्णी (Former Mayor Satish Kulkarni) यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरात अधिकाधिक प्रकल्प आणण्याचे प्रयत्न केले, त्यात त्यांना यश देखील मिळाले. यामध्ये प्रामुख्याने नमामी गोदेसह ( Namami Goda ) भव्य आयटी हब तसेच लॉजिस्टिक पार्कचा (IT hub as well as logistics park0pसमावेश होता.

2019 मध्ये विकास आघाडीचे सरकार राज्यात आले तर महापालिकेत प्रशासकराज सुरू झाल्याने शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे तसेच भाजप काळातील प्रकल्पांना काही प्रमाणात ब्रेक लावण्यात आले. आतापर्यंत सल्लागारची देखील नेमणूक न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान आता राज्यात सत्ता बदल होऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्याने हे प्रकल्प मार्गी लागतील, अशा दावा केला जात आहे.

माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून मार्च 2022 मध्ये आयटी हबचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याहस्ते लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन झाले. दरम्यान राणे यांनी आयटी हबसाठी लवकरात लवकर डीपीआर पाठवा. केंद्राकडून हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महापालिकेकडून आयटी हबसाठी मधल्या काळात कन्सल्टंटची नेमणूकच न झाली नाही. त्यामुळे माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासाठी महत्वकांशी असलेले आयटी हब आणि लॉजिस्टिक पार्क बारगळले जाणार काय, असे चित्र आहे. परन्तु राज्यात सत्ता बदल झाल्याने भाजपच्या या दोन्ही प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे.

आयटी हबमुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील युवकांना आयटीमध्ये रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा माजी माजी महापौर कुलकर्णी यांनी केला होता. दरम्यान भाजपकडून आयटी हब घेण्यात येऊन शहरात आयटी हबची यानिमित्ताने मुहूर्तमेढ रोवली जाणार असल्याचा विश्वास त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता.

तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांची बदली झाल्यानंतर रमेश पवार यांनी पालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. मात्र त्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आयटी हबसाठी जो डीपीआर आहे तो केंद्राकडे कधी पाठविला जाणार याकडे लक्ष होते.

परतु अद्याप आयटी हब आणि लॉजिस्टिक पार्ककडे लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. नुकताच डॉ. चंद्रकात पूलकुंडवार यांनी पालिका आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आहे. त्यातच राज्यात शिंदे गट - भाजप यांचे सरकार आल्याने आता तरी भाजपसाठी महत्वाचे असलेले हे दोन्ही प्रोजेक्ट येत्या काही दिवसांत प्रक्रियेत आणले जाणार का, असा सवाल केला जातोय.

पाठपुरावा करणार

भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळात प्रशासनाने पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य केले नाही. यामुळे शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे प्रकल्प रखडले होते. मात्र आता राज्यात सत्ता बदल झाले असून भारतीय जनता पक्ष सत्तेत आले आहे, लवकरच वरिष्ठ पदाधिकारी तसेच अधिकार्‍यांशी भेटीगाठी घेऊन पाठपुरावा करणार तसेच सर्व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार- सतीश कुलकर्णी, माजी महापौर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com