
दिल्ली | Delhi
ISRO ने शुक्रवारी आपले नवीन आणि सर्वात लहान रॉकेट SSLV-D2 लाँच करण्यात आलं आहे. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले.
या रॉकेटमधून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट (EOS 07), अमेरिकन कंपनी अँटरीसचा 'जानस 1' आणि देशभरातील विद्यार्थिनींनी बनवलेल्या 'आझादीसॅट 2' या लहान उपग्रहांना पृथ्वीभोवती ४५० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आलं आहे.
इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी SSLV-D2 च्या प्रक्षेपणानंतर सांगितले, "आता आपल्याकडे नवीन प्रक्षेपण व्हेईकल आहे. SSLV-D2 ने दुसऱ्या प्रयत्नात उपग्रहांना कक्षेत यशस्वीरित्या सोडले आहे. तिन्ही उपग्रह टीमचे अभिनंदन."
SSLV चा उद्देश लहान उपग्रह प्रक्षेपित करणे आहे. यासोबतच पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) चा वापर आत्तापर्यंत प्रक्षेपणात मोठ्या प्रमाणात केला जातो. SSLV मुळे ते आता मोठ्या मोहिमांसाठी फ्री राहील. SSLV ५०० किमी अंतरावरील प्लॅनर ऑर्बिटमध्ये १० ते ५०० किलो वजनाची वस्तू वाहून नेऊ शकते.
SSLV-D2 चे एकूण वजन १७५.२ किलो आहे, ज्यामध्ये १५६.३ किलो वजनाचा इओएस उपग्रह, १०.२ किलो वजनाचा Janus-1 आणि AzaadiSat-2 हा ८.७ किलो आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार एसएसएलव्ही रॉकेटची किंमत सुमारे ५६ कोटी रुपये आहे.
इस्रोच्या 'बेबी रॉकेट'ने अर्थात SSLV-D1 ने याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये पहिलं यशस्वी उड्डाण केलं होतं. त्यावेळी EOS-02 आणि आझादी सॅट या उपग्रहांचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं.