गोवर प्रतिबंध, निर्मूलनासाठी जिल्ह्यात विलगीकरण कक्ष

गोवर प्रतिबंध, निर्मूलनासाठी जिल्ह्यात विलगीकरण कक्ष

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

गोवर प्रतिबंध (Prevention of measles) आणि निर्मूलनासाठी आरोग्य विभागातर्फे (Department of Health) जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय (District Government Hospital), उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामिण रुग्णालये या ठिकाणी विलगीकरण कक्ष (Isolation word) उभारण्यात आले आहेत.

गोवरला प्रतिबंध व्हावा तसेच त्याचे निर्मूलन करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने (state government) टास्क फोर्सची (Task Force) नियुक्ती करण्यात आली आहे. या टास्क फोर्सने गोवरला प्रतिबंधासाठी विलगीकरण कक्ष उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामिण रुग्णालये या ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारले आहे.

जिल्ह्यात गोवर प्रतिबंधीत (Prevention of measles) ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे (zilha parishad) प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल नेहेते (District Health Officer Dr. Harshal Nehete) यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील ग्रामिण भागात गोवरचा एकही रुग्ण नाही. तसेच दोन दिवसांपूर्वी पाठविण्यात आलेल्या नमुण्यांच्या अहवालात एक रुग्ण पॉझिटीव्ह होता. मात्र, योग्य उपचार पद्धतीनंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.

बालकांच्या लसीकरणास प्राधान्य

कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून या बालकांना आवश्यक पोषण आणि अ जीवनसत्त्वाचा डोस देण्याच्या सूचना टास्क फोर्सने प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात याबाबतची कार्यवाही प्रभाविपणे राबविण्यात येत असल्याचे डॉ नेहेते यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com