ISIS भारतात जाळे पसरवण्याच्या तयारीत ?
मुख्य बातम्या

ISIS भारतात जाळे पसरवण्याच्या तयारीत ?

संयुक्त राष्ट्रानं जारी केलेल्या रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा

Ramsing Pardeshi

नवी दिल्ली – New Delhi

भारतासाठी धोक्याचा इशारा देतांना संयुक्त राष्ट्रानं जारी केलेल्या रिपोर्टमुळे धक्कादायक खुलासा केला आहे आहे. रिपोर्टनुसार ISIS चे १८०-२०० सदस्य भारतात सक्रीय आहेत. हे सदस्य केरळ आणि कर्नाटकसारख्या राज्यात पसरले आहेत. त्याचसोबत ISIS ने भारतात विलायह ऑफ हिंद प्रांत बनवण्याची घोषणा केली आहे. ISIS ही दहशतवादी संघटना भारतासाठी धोकादायक बनण्याची चिन्हं दिसत आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, भारतात ISIS कोविड १९ नावाखाली लोकांकडून पैसे मागत आहेत, लोकांमध्ये त्यांचा प्रोपेगेंडा पसरवत आहे. एका मॅगजीनच्या सहाय्याने लॉकडाऊन दरम्यान ISIS चा प्रोपेगेंडा पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी काही समुदायाच्या लोकांचा वापर करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.

हे सर्व लोक टेलीग्रामच्या माध्यमातून त्यांचे संघटन चालवत होते. त्यासोबत फेसबुकवर फेक नावाने सक्रीय होते. सध्या स्पेशल सेल आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्था खुरासान मॉड्यूलची पडताळणी करत आहेत. जे मॅगजीनद्वारे प्रोपेगेंडा पसरवत आहेत. भारतीय तपास यंत्रणा यादिशेने चौकशी करत असून त्यांना यशही मिळालं आहे. त्यांनी केरळ आणि कर्नाटकातून काही संशयित लोकांवर कारवाई केली आहे.

आतापर्यंत या प्रकरणात काहींना अटक करण्यात आली आहे. यात हिना बशीर बेग, जहानजेब, अब्दुल बाशित, सादिया अनवर शेख आणि नबेल यांचा समावेश आहे. हे सर्व सीएए आणि नागरिकत्वा सुधारणा कायद्याच्या नावाखाली युवकांना भडकावत होते, दिल्लीत लोन वुल्फ अटक प्लॅनिंगदेखील करत होते.

इस्लामिक स्टेट (ISIS) ने पहिल्यांदाच भारतात प्रांत स्थापन करण्यात यशस्वी झालं आहे. न्यूज एजेंसी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार काश्मीरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीनंतर हा दावा करण्यात आला आहे. या प्रांतचं नाव विलायह ऑफ हिंद असं ठेवलं आहे. एप्रिलमध्ये इराक आणि सिरीयातून आयएसच्या वर्चस्वाला धक्का पोहचल्यानंतर त्यांनी आत्मघातकी हल्ल्याचं प्रमाण वाढवलं आहे काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट केले होते यात २५३ लोकांचा मृत्यू झाला होता.

Deshdoot
www.deshdoot.com