Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या शिंदे गटात 'कूछ तो गडबड है'?

नाशिकच्या शिंदे गटात ‘कूछ तो गडबड है’?

नाशिक | Nashik

मागील काही दिवसांपासून आमदार सुहास कांदे शिंदे गटात नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी दादा भुसेंनी विचारणा केली असता ते म्हणाले की, याबाबत कोणताही चुकीचा अर्थ लाऊ नका, आम्ही एक दिलाने काम करीत आहोत, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सांगितले होते…

- Advertisement -

आमदार सुहास कांदे हे कोणत्याही कार्यक्रम, अथवा बैठकांना दिसत नसल्याने ते नाराज आहेत की, काय अशी चर्चा होत होती. यावर आता सुहास कांदे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

कांदे म्हणाले कि, मला महत्त्वाच्या बैठकांना का बोलावले जात नाही, हे दादा भुसेंनाच विचारा. मात्र शिंदे गटासोबत आपण मरेपर्यंत असल्याची ग्वाही कांदे यांनी दिली. आपण नाराज नसून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर आपला विश्वास आहे.

‘धर्मवीर’च्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरुवात?

ते पुढे म्हणाले की, शिंदे गटाचे कार्यालय नाशिकमध्ये उघडले आहे हेच मला माहिती नाही, मुख्यमंत्री येणार आहेत, हे माहिती होत, मात्र नांदगाव मतदारसंघात एका महंतांचे निधन झाल्याने येऊ शकलो नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांना कळविले, यायला जमणार नाही असे सांगितले, त्यांनीही होकार दिला. त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाचे कार्यालय आहे का? हे आता माहिती पडत आहे.

Video : बंदुकीचा धाक दाखवत जबरी दरोडा; 28 तोळे सोन्यासह 17 लाख 34 हजारांचा ऐवज लंपास

कुठल्याची बैठकीची माहिती मिळत नाही, म्हणूनच बैठकीला अनुपस्थित राहतो. शासन, जनसंपर्क आधिकारी यांच्याकडून माहिती मिळत नाही. पीआरओ कडून माहिती दिली जात नाही. दादा भुसेंचा मी आदर करतो, तक्रार करत नाही. भुसेंचे नेतृत्व मान्य आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. त्यामुळे ही तक्रार नाही, मात्र वेगळे का ठेवले जात आहे. महत्वाच्या बैठकांना का बोलवलं जात नाही. हे भुसेंना विचारा, असे सवाल कांदे यांनी केला. शिवाय जिल्ह्याच्या पक्ष प्रमुख कोणीतरी असतो, नाशिकच्या शिंदे गटाचा बॉस कोण हेच मला माहिती नाही, असा आश्चर्यकारक सवालही सुहास कांदे यांनी उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या