Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलीस ठाण्यासाठी सरकार उदासीन ?

अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलीस ठाण्यासाठी सरकार उदासीन ?

नवीन नाशिक | निशिकांत पाटील | Navin Nashik

अंबड (Ambad) परिसराचा झपाट्याने विकास झाला असून त्यासोबतच याठिकाणी गुन्हेगारीचे (crime) प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने

- Advertisement -

याठिकाणी करण्यात आलेल्या स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या (Independent Police Station) प्रस्तावाकडे राज्य सरकारने गांभीयाने लक्ष न दिल्यामुळे त्याचा त्रास येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर सोसावा लागणार आहे.

अंबड पोलीस ठाण्याची (Ambad Police Station) हद्द भौगोलिक दृष्ट्या मोठी असल्याने अंबड औदयोगिक परिसर व त्याबाजूच्या विकसित परिसरात काही घटना घडली तर पोलिसांना पोहोचायला किमान २० ते २५ मिनिटे लागत असल्याने गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना (criminals) पळून जाण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होते.

अंबड औद्योगिक वसाह्तीलगत (Ambad Industrial Estate) घरकुल योजना, खालचे चुंचाळे, वरचे चुंचाळे, दत्त नगर, कारगिल चौक, अंबड लिंक रोड आदी परिसराचा झपाट्याने विकास झाला असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रहिवासी वसाहत वाढली आहे. याठिकाणी उत्तर भारतीय नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे.

परिसर वाढी सोबतच याठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढल्याने येथील स्थानिक नागरिक साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे, रामदास दातीर यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करून स्वतंत्र पोलीस ठाणे होण्याकरिता हजारो नागरिकांची सह्यांची मोहीम घेण्यात आली. त्यानंतरही मागणी मान्य न झाल्याने शेकडो नागरिकांचा नाशिक ते मंत्रालय मुंबई असा अर्धनग्न मोर्चा देखील काढण्यात आला होता त्यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सिमा हिरे (MLA Seema Hirey) यांनी मध्यस्ती करत

आंदोलनकर्त्यांची पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांची भेट घडवून आणत पालकमंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन १५ दिवसांत सदरहू प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले व मोर्चा स्थगित करण्यात आला. या गोष्टीला कित्येक महिने लोटली गेली मात्र अंबड पोलीस ठाण्याच्या विभाजनाची फाईल मंत्रालयात कुठे हरवली कि काय ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

राज्यात व केंद्रात सत्ताधारी पक्ष असलेल्या पक्षाचे नाशकात तिन आमदार आहेत तरी देखील अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करून स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रश्न अद्यापही मार्गी लागत नसल्याने भविष्यात जर अंबड औद्योगिक वसाहतीच्या शेजारील परिसरात काही मोठी घटना घडली तर याला जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या