पंतप्रधान मोदींचा हुकुमशाहीवर विश्वास? अमित शहांनी दिले हे उत्तर

पंतप्रधान मोदींचा हुकुमशाहीवर विश्वास? अमित शहांनी दिले हे उत्तर
अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah)यांनी सरकारी न्यूज चॅनल संसद टीव्हीला एक विशेष मुलाखत (interview)दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांना सत्तेत 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मुलाखत दिली. यावेळी अमित शाह (amit shah)यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वगुणापासून ते त्यांच्यावर होणाऱ्या टीकांपर्यंत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

अमित शाह
सप्तशृंगीदेवीचे दर्शन ऑनलाईन पासनंतरच, जाण्यापुर्वी वाचा ही नियमावली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? या प्रश्नावर अमित शहा म्हणाले, ‘‘मी त्यांना अगदी जवळून काम करताना पाहिले आहे. हे सर्व लोक जे आरोप करतात, ते पूर्णपणे निराधार आरोप आहेत. मी मोदींसारखा श्रोता पाहिला नाही. कुठलीही बैठक असो, ते किमीत कमी बोलतात, अतिशय संयमाने ऐकतात आणि नंतर योग्य तो निर्णय घेतात. कधी-कधी तर आम्हालाही वाटते, की एवढा विचार सुरू आहे. पण ते प्रत्येकाचे ऐकतात आणि गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेतात. मोदी सर्वांचे म्हणणे ऐकूण घेतात, छोट्यातल्या छोट्या व्यक्तीचा सल्ला घेतात आणि त्यावर निर्णयही घेतात. त्यामुळे, ते निर्णय लादणारे नेते आहेत, असे म्हणणे, यात काहीही तथ्य नाही.”

जोखीम पत्करुन निर्णय घेतात

राजकारण नेते धोका पत्करात नाही. त्यामुळे अनिश्चितता निर्माण होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी जिद्दीने जोखीम पत्करतात आणि निर्णय घेतात या प्रश्नावर अमित शाह यांनी भाष्य केले आहे. “मी तुमच्या मताशी सहमत आहे. पण हट्टीपणा हा शब्द बरोबर नाही. ते जोखीम पत्करुन निर्णय घेतात हे बरोबर आहे. कारण त्यांचा विश्वास आहे की, आम्ही देश बदलण्यासाठी सरकारमध्ये आलो आहोत. सरकार चावण्यासाठी सरकारमध्ये नाही आलो. आमचे लक्ष देशात बदल घडवून आणण्याचे आहे. १३० कोटी भारतीयांना जगातल्या सर्वात सन्माजनक जागी पोहोचवाचे आहे. जे वर्षानुवर्षे इथेच पडून आहेत. आपला युवा वर्ग पश्चिमेकडील देशांकडे नसता गेला जर हे निर्णय झाले असते. पण ते आता होत आहे.”

मोदींच्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांविषयी विचारले असता शाहा म्हणाले, “त्यांचे सार्वजनिक जीवन तीन भागात विभागले जाऊ शकते. एक, भाजपामध्ये सामील झाल्यानंतर त्यांचा पहिला काळ हा संघटनात्मक कामाचा होता. दुसरा काळ त्यांचा मुख्यमंत्री आणि तिसरा राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतर. त्याचे सार्वजनिक जीवन या तीन भागांमध्ये विभागले जाऊ शकते.”

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com