Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाफेडच्या कांदा खरेदीत अनियमितता; प्रशासनाकडून होणार चौकशी

नाफेडच्या कांदा खरेदीत अनियमितता; प्रशासनाकडून होणार चौकशी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाफेडने केलेल्या कांदा खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याबाबतची प्रशासनातर्फे चौकशी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

यामध्ये दोषी आढळल्यास अनियमितता (Irregularities) करणारे फेडरेशन्स (Federations), एफपीओ (FPO) रडारवर येण्याची शक्यता व्यक्त असून भविष्यातील कामकाजातून काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे वृत्त आहे.

नाफेडकडून खरेदी करण्यात आलेल्या कांदा व्यवहारात अनियमितता झाल्याच्या तक्रारी असून, खरेदी केलेला कांदा (onion) मोठ्या प्रमाणावर सडला आहे याची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State Dr. Bharti Pawar), पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी जिल्हाधिकार्‍यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. या प्रकरणात नाफेडचे अधिकारी प्रशासनाला दाद देत नसल्याने

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) नाफेडच्या कांदा खरेदी तक्रारींच्या अनुषंगाने नुकतीच बैठक घेतली होती. यावेळी नाफेडचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्र कुमार (NAFED Assistant Manager Shailendra Kumar) यांनी नाफेडच्या माध्यमातून खरेदी झालेल्या दोन लाख 38 हजार मेट्रिक टन कांदा खरेदीत किती कांदा खराब झाला याची आकडेवारी देता येणार नाही, असे सांगत टाळाटाळ केली.

त्यामुळे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) यांनी निफाड (niphad) प्रांत अर्चना पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून नाफेडची चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे. नाफेड साठवणूक केलेल्या कांद्याची सध्या विल्हेवाट लावत असून खरेदी करणार्‍या महासंघांना मअफ दर्जाचा कांदा इतर राज्यातील नाफेडच्या शाखांमध्ये पाठवण्याचे आणि स्थानिक बाजारपेठेत बीफ दर्जाचा कांदा विकण्याचे निर्देश दिले असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या