IPL रद्द आता पुढे काय ? कधी होणार स्पर्धा ?

BCCI ला दोन हजार कोटींचा फटका ?
IPL रद्द आता पुढे काय ? कधी होणार स्पर्धा ?
IPLIPL

नवी दिल्ली

मागील दोन दिवसांत आयपीएलमधील चार खेळाडू आणि २ कोचिंग स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानंतर IPL टुर्नामेंट स्थगित करण्यात आला आहे. उर्वरित सामने पुढे कधी घेतले जातील, याबाबत अजून काहीच सांगण्यात आलेले नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडू यंदाच्या स्पर्धेचा उर्वरित टप्पा हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतरच होणार आहे. आता IPL भारतात होण्याएेवजी यूएईत होईल, जवळपास नक्की आहे. ट्वेंटी-२० वर्ल्डकप १८ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर २०२१ मध्ये होणार आहे.

Title Name
BCCI ची मोठी घोषणा, IPL चे पुढील सर्व सामने रद्द
IPL

बीसीसीआयने IPL रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक प्रसिद्धी पत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे की, “IPL रद्द करण्याचा हा निर्णय गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत BCCIच्या प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत एकमताने घेतला आहे. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि या स्पर्धेशी संबंधित प्रत्येक व्यक्तिच्या सुरक्षिततेबाबत बीसीसीआय कोणतीच तडजोड करणार नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी आणि भागीदारांचा विचार लक्षात घेता हा निर्णय घेतला गेला आहे.''

गेल्या वर्षी देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तेरावा हंगाम युएईत आयोजित करण्यात आला होता. मात्र यंदाचा हंगाम भारतातच घेण्यात आला. देशभरात लाखो कोरोना रुग्ण आढळत असताना आणि हजारो देशवासीयांना ऑक्सिजन, बेड, औषधे यांच्यासाठी वणवण करावी लागत असताना ही स्पर्धा सुरू असल्याने माध्यमांमधून जोरदार टीकाही करण्यात आली होती.

२००० कोटींचे नुकसान

IPL रद्द करण्याच्या निर्णयामुळे बीसीसीआयला २ हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे म्हटले जात आहे. स्पर्धा रद्द झाल्यामुळे ५०% म्हणजेच २ हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.तसेच, यावर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्व चषकावरही कोरोनाचे सावट आहे. या कोरोनामुळे भारतात होणारा विश्व चषक रद्द होऊन इतर देशात घेतला जाऊ शकतो. यामुळे, BCCI ला कोट्यावधींचे नुकसान होऊ शकते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com