BCCI ची मोठी घोषणा, IPL चे पुढील सर्व सामने रद्द

आयपीएलमध्ये कोरोना शिरकाव झाल्यामुळे निर्णय
 BCCI ची मोठी घोषणा, IPL चे पुढील सर्व सामने रद्द

नवी दिल्ली:

देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरु असलेली आयपीएल 2021 ची स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली. अनेक खेळाडू कोरोना संक्रमित झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

केकेआरचे दोन खेळाडू हे कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने आता थेट सामना रद्द करण्याचा निर्णय काल घेण्यात आला होता. या प्रकारे मॅच रद्द झाल्यास ही आयपीएलच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

याआधी अशी शक्यता वर्तवली जात होती की सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार आहेत. मात्र आता राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे.

Title Name
IPL रद्द आता पुढे काय ? कधी होणार स्पर्धा ?
 BCCI ची मोठी घोषणा, IPL चे पुढील सर्व सामने रद्द
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com