
लखनौ | वृत्तसंस्था
लखनौ येथील इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात IPL-2023 चा क्रिकेटचा सामना खेळण्यात आला.यात पंजाबच्या संघाने बाजी मारली.
पंजाबच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या संघाकडून कर्णधार लोकेश राहुल व काईल मेयर्स सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या आठव्या शतकात हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर हरप्रीत सिंघने काईल मेयर्सला झेल बाद करत लखनौच्या संघास पहिला धक्का दिला.काईल मेयर्सने २३ चेंडूत ३ शतकात व १ चौकार लगावत २९ धावा केल्या. ९व्या षटकात सिकंदर झाच्या गोलंदाजीवर दीपक हुड्डा पायचीत होत अवघ्या २ धावांवर माघारी परतला. सामन्याच्या ९ व्या षटकात २ गडी बाद ६४ धावा अशी स्थिती लखनौच्या संघाची होती.
१५व्या षटकात कासिगो रबाडाच्या गोलंदाजीवर शाहरुख खानने कृणाल पांड्याला झेल बाद करत लखनौच्या संघाला तिसरा धक्का दिला. कृणाल पांड्याने १७ चेंडूत १८ धावा केल्या. पाठोपाठ कासिगो रबाडाच्या गोलंदाजीवर शाहरुख खानने निकोलस पूरनला झेल बाद करत शून्यावर माघारी पाठविले. १५ षटकात ४ गडी बाद १११ धावा अशी स्थिती लखनौच्या संघाची होती.
सॅॅम कुरनच्या गोलंदाजीवर जितेश शर्माने मार्कस स्टोइनीसला झेल बाद केले.मार्कस स्टोइनीसने ११ चेंडूत १५ धावा केल्या. सलामीला आलेल्या कर्णधार लोकेश राहुलने ५६ चेंडूत १ षटकार व ८ चौकार लगावत एकूण ७४ धावा केल्या.अठराव्या षटकात लोकेश राहुल झेल बाद झाला. पाठोपाठ कृष्णाप्पा गौतम १ धाव तर युधवीर सिंघ शून्यावर बाद झाला.२०व्या षटका अखेरीस लखनौच्या संघाने ८ गडी बाद १२० धावा केल्या.
पंजाबच्या संघाकडून अथर्व तायडे व प्रभसिमरन सिंघ प्रथम फलंदाजीस आले. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूत युधवीर सिंघच्या गोलंदाजीवर अथर्व तायडेला आवेश खानने शून्यावर झेल बाद करत पंजाबच्या संघास पहिला धक्का दिला. तिसऱ्या षटकात युधवीर सिंघने प्रभसिमरन सिंघला अवघ्या ४ धावांवर त्रिफळाचीत केले. कृष्णाप्पा गौतमच्या गोलंदाजीवर मार्क स्टोयनिसने मॅॅट शाॅॅर्टला झेल बाद केले.मॅॅट शाॅॅर्टने २२ चेंडूत ३३ धावा केल्या.हरप्रीत सिंघने २२ चेंडूत २२ धावा करत झेल बाद झाला. रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर कुणाल पांड्याने सॅॅम कुरनला ६ धावांवर झेल बाद करत माघारी पाठविले.
सिकंदर रझाने ४१ चेंडूत ५७ धावा केल्या.सामन्याच्या १८व्या षटकात रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर मार्क स्टोयनिसने सिकंदर रझाला झेल बाद केले.तर शाहरुख खानने आक्रमक फलंदाजी करत १० चेंडूत २ षटकार व १ चौकार लगावत नाबाद २३ धावा केल्या.
पंजाबने लखनौच्या संघावर २ गडी राखून व ३ चेंडूत शिल्लक ठेऊन विजय मिळविला.