IPL 2023 : मुंबई इंडियन्स-लखनऊ सुपरजायंट्स आज आमनेसामने; कुणाला मिळणार बाद फेरीचे तिकीट?

IPL 2023 : मुंबई इंडियन्स-लखनऊ सुपरजायंट्स आज आमनेसामने; कुणाला मिळणार बाद फेरीचे तिकीट?

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये आज मंगळवार (दि.१७) रोजी लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनऊ सुपरजायंट्सशी (Mumbai Indians vs Lucknow Supergiants) सायंकाळी ७:३० वाजता होणार असून बाद फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहे...

IPL 2023 : मुंबई इंडियन्स-लखनऊ सुपरजायंट्स आज आमनेसामने; कुणाला मिळणार बाद फेरीचे तिकीट?
त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची गृहमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल; दिले 'हे' आदेश

तसेच लखनऊचा नियमित कर्णधार के.एल. राहुल दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला असून लखनऊचे कर्णधारपद कृणाल पांड्याकडे (Krunal Pandya) सोपविण्यात आले आहे. लखनऊला आपले बाद फेरीतील स्थान टिकवून ठेवायचे असेल तर आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. तर गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) मिळविलेल्या विजयानंतर मुंबई इंडियन्स स्पर्धेतील आपला आठवा विजय संपादन करून अव्वल २ संघांमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

IPL 2023 : मुंबई इंडियन्स-लखनऊ सुपरजायंट्स आज आमनेसामने; कुणाला मिळणार बाद फेरीचे तिकीट?
एसटी-लक्झरी बसचा अपघात; सहा प्रवासी गंभीर जखमी

दरम्यान, यंदाच्या हंगामात दोन्ही संघ प्रथमच एकमेकांसमोर येत असून गुणतालिकेतील लखनऊ १३ गुण मिळवून चौथ्या तर मुंबई १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तसेच आजच्या सामन्यात पराभव झाल्यास दोन्ही संघाची आयपीएल २०२३ मधील वाट अधिक खडतर होणार आहे. त्यामुळे विजय (Victory) संपादन करणारा संघ बाद फेरीतील स्थानासाठी आपला दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com