Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाIPL 2023 : मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स पहिल्या विजयासाठी भिडणार

IPL 2023 : मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स पहिल्या विजयासाठी भिडणार

मुंबई | Mumbai

आयपीएल १६ मध्ये आज मंगळवार (दि.११) रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) संघामध्ये दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. हे दोन्ही संघ यंदाच्या हंगामातील आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत…

- Advertisement -

बाबरी पाडली तेव्हाचे उंदीर आता खंदकातून बाहेर येत आहेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबईचे कर्णधारपद रोहित शर्मा (Rohit Sharma) तर दिल्लीचे डेविड वॉर्नरकडे (David Warner) असणार आहे. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सप्रमाणे दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी देखील अतिशय खराब राहिलेली आहे. तर आयपीएल २०१६ मध्ये दिल्लीला लखनऊ सुपरजायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सविरुद्ध सलग ३ सामन्यात पराभव स्वीकारावे लागले आहेत. तर मुंबईला चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने पराभूत केले आहे. त्यामुळे पराभवाची मालिका थांबविण्याचे या दोन्ही संघाचे प्रयत्न असणार आहेत.

राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

यंदाच्या हंगामात दिल्लीसाठी डेविड वॉर्नर आणि अक्षर पटेल आपले योगदान देत आहेत. मात्र दुसरीकडे पृथ्वी शॉ, मनीष पांडे, सर्फराज खान हे खेळाडून फलंदाजीत (Batting) अपयशी ठरत आहे. तर गोलंदाजीत (Bowling) कुलदीप यादव, अक्षर पटेल, एन्रिक नॉरकिया प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण आणून त्यांना बाद करण्यात यशस्वी ठरले आहेत.

जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा वीज पडल्याने जळून खाक

तसेच मुंबईकडून यंदाच्या हंगामात तिलक वर्मा वगळता ईशान किशन, रोहित शर्मा, टीम डेविड, कॅमेरून ग्रीन या महत्त्वाच्या खेळाडूंनी सफशेल निराशा केली आहे. शिवाय जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची भिस्त जोफ्रा आर्चरवर आहे. परंतु, तो देखील मागील २ सामन्यात आपल्या गोलंदाजीतून चमक दाखवू शकलेला नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या