IPL 2023 : कोलकाता-राजस्थान आज आमनेसामने, कोण मारणार बाजी?

IPL 2023 : कोलकाता-राजस्थान आज आमनेसामने, कोण मारणार बाजी?

कोलकाता | Kolkata

आयपीएलमध्ये (IPL) आज गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाशी होणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे.

आयपीएल २०२३ मध्ये सलामीच्या ५ सामन्यात ४ विजय आणि १ पराभव झालेल्या राजस्थान रॉयल्स संघ पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. आयपीएल २०२३ मध्ये अव्वल ४ संघांमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी राजस्थान संघाला आपले उर्वरीत ३ सामने जिंकावे लागणार आहे.

IPL 2023 : कोलकाता-राजस्थान आज आमनेसामने, कोण मारणार बाजी?
नाशकात शिवसैनिकांचा जल्लोष

गुजरात टायटन्स आणि सनराईझर्स हैद्राबाद संघांविरुद्ध आपल्या जयपूरच्या घरच्या मैदानावर पराभव झालेला राजस्थान रॉयल्स पराभवाची हॅटट्रिक टाळण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध रॉयल विजय संपादन करून विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

सलग ५ सामन्यात पराभव झालेला कोलकाता नाईट रायडर्स संघाला मागील २ सामन्यात सनराईझर्स हैद्राबाद आणि पंजाबकिंग्ज संघांविरुद्ध रोमहर्षक विजय संपादन केल्यामुळे विजयाची चव चाखायला मिळाली आहे.

IPL 2023 : कोलकाता-राजस्थान आज आमनेसामने, कोण मारणार बाजी?
Maharashtra Satta Sangharsh : अखेर सत्याचाच विजय; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीसांची प्रतिक्रिया

पंजाबकिंग्ज आणि हैद्राबादविरुद्ध विजय संपादन केल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला कोलकाता सलग तिसरा विजय संपादन करून विजयी षट्कार मारण्यासाठी सज्ज असणार आहे. आयपीएल २०२३ मध्ये ५६ वा सामना दोन्ही संघांमध्ये होणार आहे. आयपीएल १६ मध्ये दोन्ही संघ प्रथमच एकमेकांचा सामना करणार आहेत. आयपीएल २०२२ मध्ये दोन्ही संघांमध्ये झालेल्या दोन साखळी सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ विजय संपादन केला होता.

कोलकाता संघाचे कर्णधारपद नितीश राणाकडे असेल राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व संजू सॅमसन सांभाळेल . दोन्ही संघांच्या खात्यात ११ सामन्यात १० गुण असून, राजस्थान रॉयल्स संघाने ५ विजय आणि ५ पराभव स्वीकारले आहेत. दुसरीकडे कोलकाता संघाने ५ विजय आणि ६ पराभव स्वीकारले आहेत. दोन्ही संघांसाठी आजचा सामना बाद फेरीच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

IPL 2023 : कोलकाता-राजस्थान आज आमनेसामने, कोण मारणार बाजी?
Maharashtra Satta Sangharsh : राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर; सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

आजच्या सामन्यात विजय संपादन करणाऱ्या संघाला अव्वल ४ संघांमध्ये आपले स्थान पटकावण्याची संधी असणार आहे. दोन्ही संघांमध्ये आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण २७ सामने झाले असून, कोलकाताने १४ तर राजस्थान रॉयल्स संघाने १२ सामन्यात विजय संपादन केला आहे. १ सामना अनिकाली राहिला आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com