जोफ्रा आर्चर IPL 2023 मधून बाहेर, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील

जोफ्रा आर्चर IPL 2023 मधून बाहेर, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील

मुंबई | Mumbai

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईच्या संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये टिकून राहायचे असेल तर हा समान संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे. पण स्पर्धेच्या मध्यातच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची फिटनेसची चिंता संपलेली नाही आणि त्यामुळे तो पुनर्वसनासाठी त्याच्या घरी परतणार आहे. अशाप्रकारे जोफ्रा आर्चर उर्वरित आयपीएलमधून बाहेर पडला आहे. जोफ्रा आर्चरला या लीगमधील संपूर्ण सामनेही खेळता आले नाही आणि आता आर्चरऐवजी मुंबईने ख्रिस जॉर्डनचा संघात समावेश केला आहे.

जोफ्रा आर्चर IPL 2023 मधून बाहेर, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील
Bus Accident : भीषण अपघात! बस पुलावरून कोसळून १५ ठार, २५ जखमी... बचावकार्य सुरू

जॉर्डनने २०१६ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि त्याने आतापर्यंत २८ सामन्यांत २७ विकेट घेतले आहेत. या वेगवान गोलंदाजाने ८७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९६ विकेट घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सने ख्रिस जॉर्डनला त्याची मूळ किंमत २ कोटी रुपयांसह करारबद्ध करत संघात घेतले आहे. हा खेळाडू आतापर्यंत आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसला आहे.

जोफ्रा आर्चर IPL 2023 मधून बाहेर, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील
Char Dham Yatra : केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला... थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

आर्चर याला मागील वर्षी मुंबई इंडियन्सने 8 कोटींची मोठी रक्कम देत आपल्या ताब्यात सामील करून घेतले होते. मात्र, दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकला नव्हता. यावेळी देखील पहिल्या सामन्यानंतर तो संघातून बरेच दिवस बाहेर राहिला. मधल्या काळात बेल्जियमला जाऊन त्याने आपल्या हातावर उपचार देखील घेतले.

जोफ्रा आर्चर IPL 2023 मधून बाहेर, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन, ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मात्र, आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने विनंती केल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आता त्याच्या या दुखापतीवर लक्ष ठेवेल. तसेच, त्याला योग्य आराम प्रक्रिया देखील उपलब्ध करून देईल. यावर्षी इंग्लंडला प्रतिष्ठेची ऍशेस मालिका तसेच भारतात वनडे विश्वचषक खेळायचा असल्याने आर्चर उपलब्ध असणे गरजेचे असेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com