IPL-2022 : अंतिम लढतीत कुणाची बाजी?

गुजरात-राजस्थानमध्ये आज सामना
IPL-2022 : अंतिम लढतीत कुणाची बाजी?

अहमदाबाद । वृत्तसंस्था ( Ahmedabad )

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स ( Gujrat Titansआणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स ( Rajsthan Royals )यांच्यामध्ये आज अंतिम लढत होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ही लढत होणार आहे.

शुक्रवारी राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. आता रविवारी रात्री या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. राजस्थानचा संघ तब्बल 14 वर्षांनंतर अंतिम फेरीमध्ये पोहोचला आहे. तर गुजरातच्या संघाने आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामात फायनलमध्ये धडक मारली आहे.

राजस्थान रॉयल्सची सर्वात मोठी ताकद जोस बटलर आणि युजवेंद्र चहल आहे. या दोघांनी आरसीबीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. जोस बटलरने 800 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला, तर चहलने 26 विकेट घेतल्या आहेत. आरसीबीची सर्वात मोठी ताकद हीच आहे. यांच्या जोडीला इतर गोलंदाज आणि फलंदाज मदत करत आहेत. गुजरात संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रत्येक सामन्यात नवीन मॅचविनर आहे. कुणा एका खेळाडूवर गुजरातचा संघ अवलंबून नाही. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज विजयासाठी पुढे येतात. त्यामुळे गुजरातला विजयाचा प्रबळ दावेदार म्हटले जात आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स यंदा तुफान फॉर्मात आहे. पदार्पणाच्या हंगामात गुजरातने फायनलमध्ये धडक मारली.

गुजरात टायटन्सने साखळी सामन्यात दहा सामन्यांत विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले होते. तर फक्त चार सामन्यांत गुजरातचा पराभव झाला होता. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सनेही दमदार कामगिरी केली होती. राजस्थान रॉयल्सने 14 सामन्यांत नऊ विजय मिळवत दुसर्‍या क्रमांकावर कब्जा केला होता.

राजस्थानला क्वालिफायर एक सामन्यात गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर क्वालिफयर दोनमध्ये आरसीबीचा पराभव करत राजस्थान रॉयल्सने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com