IPL-2022 : राजस्थानचा लखनौवर विजय

IPL-2022 :  राजस्थानचा लखनौवर विजय

मुंबई | वृत्तसंस्था ( Mumbai )

मुंबईतील बेब्रॉन स्टेडियमवर आयपीएल-२०२२ ( IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Lucknow Super Giants VS Rajasthan Royals ) यांच्यात खेळण्यात आला. यात राजस्थानच्या संघाने बाजी मारली.

राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाकडून सलामीला यशस्वी जयस्वाल व जोस बट्लर फलंदाजीसाठी मैदानात आले.सामन्याच्या तिसऱ्या षटकात आवेश खानने जोस बट्लरला २ धावांवर क्लीन बोल्ड केले.जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर दीपक हुड्डाने संजू सॅॅमसनला झेल बाद केले. संजू सॅॅमसनने २४ चेंडूत ३२ धावा केल्या. आयुष बडोनीने यशस्वी जयस्वालला झेल बाद केले. यशस्वी जयस्वालने २९ चेंडूत ४१ धावा केल्या. देवदत्त पडीक्कलने धडाकेबाज फलंदाजी करत १८ चेंडूत ३९ धावा करत कृणाल पंड्या कडून झेल बाद झाला. रियान परागने १६ चेंडूत १९ धावा केल्या तर आर. आश्विनने ७ चेंडूत नाबाद १० धावा केल्या. राजस्थानच्या संघाने २० व्या षटका अखेर ६ गडी बाद १७८ धावा केल्या.

राजस्थानने दिलेल्या १७९ धावांचे आव्हान स्वीकारत लखनौच्या संघाकडून प्रथम क्विंटन डी. कॉक. व लोकेश राहुल फलंदाजीस आले. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर जेम्स निशॅॅमने डी. कॉकला ७ धावांवर झेल बाद केले. ट्रेंट बोल्टने आयुष बडोनीला शून्यावर क्लीन बोल्ड केले. लोकेश राहुलने १९ चेंडूत १० धावा करत यशस्वी जयस्वालकडून झेल बाद झाला. कृणाल पंड्याने २३ चेंडूत २५ धावा केल्या.रियान परागने कृणाल पंड्याला झेल बाद केले. दीपक हुड्डाने धडाकेबाज फलंदाजी केली. दीपक हुड्डाने ३९ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत ५९ धावा केल्या.संजू सॅॅमसनने दीपक हुड्डाला यष्टीचीत केले. जेसन होल्डर अवघ्या १ धावसंख्येवर झेल बाद होत माघारी परतला. ओबेड मकॉयने दुष्मंता चमिराला शून्यावर बाद केले. मार्क्स स्टोइनिस १७ चेंडूत २७ धावा करत झेल बाद झाला.

२०व्या षटका अखेर लखनौचा संघ ८ गडी बाद १५४ धावा करू शकला. राजस्थानच्या संघाने लखनौच्या संघावर २४ धावांनी विजय मिळविला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com