IPL-2022 : राजस्थानचा लखनौवर विजय

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी ( Mumbai )

मुंबईतील वानखेडे मैदानावर आयपीएल -२०२२ ( IPL-2022 ) च्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स ( Rajsthan Royals Vs Lucknow Super Giants )यांच्यातील क्रिकेट सामन्यात राजस्थान च्या संघाने बाजी मारली.

लखनौच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . राजस्थानच्या संघा कडून सलामीला जॉस बट्लर व देवदत्त पडीकल फलंदाजीस आले.आवेश खानने जॉस बट्लरला अकरा धावांवर क्लीन बोल्ड केले.

संजू सॅमसन १२ चेंडूत १३ धावा करत जेसन होल्डर च्या गोलंदाजीवर पायचीत झाला. देवदत्त पडीकलने २९ चेंडूत ४ चौकार लगावत २९ धावा केल्या. कृष्णाप्पाच्या गोलंदाजीवर जेसन होल्डर ने देवदत्तला झेल बाद केले. राजस्थानला चौथा धक्का मिळाला ड्युसेन ४ चेंडूत ४ धावा करत क्लीन बोल्ड झाला. ड्युसेनला कृष्णाप्पाने क्लीन बोल्ड केले. शिमराॅॅन हेटमायर ने दमदार फलंदाजी केली.३६ चेंडूत ६ षटकार व १ चौकार लगावत अर्धशतक पूर्ण करत ५९ धावा केल्या . २० षटकात ६ गडी बाद १६५ धावा राजस्थानच्या संघाने केल्या .

राजस्थानने दिलेल्या १६६ धावांचे लक्ष ठेवत लखनौच्या संघाकडून के एल राहुल व कृष्णाप्पा फलंदाजीस आले. लखनौच्या संघाची सुरवात काही फारशी चांगली झाली नाही . पहिल्याच शतकात लखनौच्या संघाचे दोन गडी बाद झाले. के एल राहुल व कृष्णाप्पा दोघेही शून्यावर बाद होत माघारी परतले . जेसन होल्डर १४ चेंडूत ८ धाव करत झेलबाद झाला.

६ षटकात ३ गडी बाद ३१ धावा अशी धावसंख्या लखनौच्या संघाची झाली होती . दीपक हुड्डाने २४ चेंडूत २५ धावा केल्या . कुलदीप सेनने त्यास क्लीन बोल्ड केले . आयुष् बदोनी ७ चेंडूत ५ धावां करीत झेल बाद झाला. कुणाल पंड्या १५ चेंडूत २२ धावाकरीत चहलच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.

१८ षटकात ८ गडी बाद १३२ धावा अशी स्थिती लखनौच्या संघाची झाली होती. मार्ककोस ने १७ चेंडूत ४ षटकार लगावत ३८ धावा केल्या. परंतु अवघ्या चार धावांनी संघाचा पराभव झाला. २० व्या षटका अखेर लखनौचा संघाने ८ गडी बाद १६२ धावा केल्या

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *