IPL-2022 : राजस्थानचा कोलकात्यावर विजय

IPL-2022 : राजस्थानचा कोलकात्यावर विजय

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानावर आयपीएल-२०२२ (IPL-2022)चा क्रिकेटचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Rajsthan Royals )Vs Kolkata Knight Riders )यांच्यात खेळला गेला. यात राजस्थानच्या संघाने बाजी मारली

कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाकडून सलामीला जॉस बट्लर व देवदत्त पडीक्कल फलंदाजीस आले.जॉस बट्लरने धडाकेबाज फलंदाजीस सुरवात केली.

गोलंदाज सुनील नरेनने देवदत्त पडीक्कलला क्लीन बोल्ड करत राजस्थानला पहिला धक्का दिला.देवदत्तने १८ चेंडूत ३ चौकार व १ षटकार लगावत २४ धावा केल्या. देवदत्त नंतर संजू सॅॅमसन फलंदाजीसाठी मैदानात आला. दरम्यान अकरा षटकात १ गडी बाद ११२ धावा राजस्थानच्या संघाच्या झाल्या.

संजू सॅॅमसने आक्रमक खेळी करत १९ चेंडूत २ षटकार व ३ चौकारात ३८ धावा केल्या .आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर शिवम मावी ने संजूला झेलबाद केले. जॉस बट्लरने आक्रमक खेळीत ६१ चेंडूत ५ षटकार व ९ चौकार लगावत १०३ धावा केल्या. पॅॅॅॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर वरुण चक्रवर्तीने जॉसला झेल बाद केले. २० षटका अखेरीस ५ गडी बाद २१७ धावा राजस्थानच्या संघाने केल्या.

राजस्थानने दिलेल्या २१८ धावांचे आव्हान स्वीकरत कोलकाताच्या संघाकडून सलामीला सुनील नरेन व अ‍ॅरोन फिंच फलंदाजीस आले. सुनील नरेन पहिल्याच चेंडूत धाव घेतांना शून्यावर बाद झाला.कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीस आला.श्रेयसने दमदार फलंदाजी करण्यास सुरवात केली. अ‍ॅरोन फिंच २८ चेंडूत ५८ धावा करत झेलबाद झाला. आंद्रे रसेल सुद्धा शून्यावर माघारी परतला.रवींद्रचंद्रन अश्विन ने रसेलला क्लीन बोल्ड केले. नितीश राणाला जॉस बट्लर ने झेलबाद केले. नितीश ने ११ चेंडूत १८ धावा केल्या. शिवम मावी व कमिन्स सुद्धा शून्यावर तंबूत परतले.

श्रेयस अय्यरने धडाकेबाज फलंदाजी करत कोलकाताच्या संघाला विजयाकडे नेत असतानाच श्रेयसला युज्वेंद्र चहलने पायचीत केले. श्रेयस अय्यरने ८१ चेंडूत ७ चौकार व ४ षटकार लगावत ८५ धावा केल्या. श्रेयस बाद झाल्याने सामना शेवटच्या क्षणाला फिरला .कोलकाताचा संघ २१० धावा करू शकला.

Related Stories

No stories found.