IPL-2022; Qualifier 2 : राजस्थानचा बंगळुरूवर विजय

राजस्थानचा संघ अंतिम फेरीत
IPL-2022; Qualifier 2 :  राजस्थानचा बंगळुरूवर विजय

अहमदाबाद | वृत्तसंस्था (Ahmedabad )

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपील २०२२( IPL-2022; Qualifier 2 ) क्वालिफायरचा दुसरा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅॅलेंजर्स बेंगलोर ( Rajsthan Royals Vs Royal Challengers Bangalore ) यांच्यात खेळण्यात आला. यात राजस्थानच्या च्या संघाने बाजी मारली. राजस्थानचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे.

राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेंगलोरच्या संघाकडून सलामीस विराट कोहली व फाफ डूप्लेसी फलंदाजीस आले. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर संजू सॅॅमसनने विराट कोहलीला अवघ्या ७ धावांवर झेलबाद करत बेंगलोरच्या संघास पहिला धक्का दिला.

अकराव्या षटकात फाफ डूप्लेसीला रवींद्रचंद्र आश्विनने झेल बाद केले. डूप्लेसीने २७ चेंडूत २५ धावा केल्या.ग्लेन मॅक्स्वेलने १३ चेंडूत २४ धावा करत ओबेड मकाॅॅय कडून झेल बाद झाला. रजत पाटीदारने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण करत जोस बट्लर कडून झेल बाद झाला. रजतने ४२ चेंडूत ५८ धावा केल्या.

महिपाल लोमरोर अवघ्या ८ धावांवर झेल बाद होत तंबूत परतला.रियान परागने दिनेश कार्तिकला ६ धावांवर झेल बाद करत माघारी पाठविले. वानिंदू हसरंंगाला प्रसिद्ध कृष्णाने शून्यावर क्लीन बोल्ड करत तंबूत पाठविले.ओबेड मकाॅॅयच्या गोलंदाजीवर हर्षल पटेल १ धाव काढून क्लीन बोल्ड झाला. २० व्या षटकाअखेर बेंगलोरच्या संघाने ८ गडी बाद १५७ धावा केल्या.

बेंगलोरच्या संघाने दिलेल्या १५८ धावांचे आव्हान स्वीकारत राजस्थानच्या संघाकडून प्रथम यशस्वी जयस्वाल व जोस बट्लर फलंदाजीस आले. जॉश हेझलवूडच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने यशस्वी जयस्वालला झेल बाद केले. यशस्वी जयस्वालने १३ चेंडूत २१ धावा केल्या. दिनेश कार्तिकने संजू सॅॅमसनला यष्टीचीत केले. सॅॅमसनने २१ चेंडूत २३ धावा केल्या.

जोस बट्लरने धडाकेबाज फलंदाजी केली.जोसने ६० चेंडूत ६ षटकार व १० चौकार लगावत शतक पूर्ण करत नाबाद एकून १०६ धावा केल्या. राजस्थानच्या संघाने ७ गडी राखून व ११ चेंडू शिल्लक ठेवत बेंगलोरच्या संघावर विजय मिळविला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com