Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याIPL-2022 : पंजाबचा गुजरातवर विजय

IPL-2022 : पंजाबचा गुजरातवर विजय

मुंबई | प्रतिनिधी ( Mumbai )

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयपीएल-२०२२ (IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Gujrat Titans Vs Punjab Kings ) यांच्यात खेळण्यात आला. यात पंजाबच्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या संघाकडून सलामीला वृद्धिमान शहा व शुभमन गिल फलंदाजीस आले. शुभमन गिल ६ चेंडूत ९ धावा करत ऋषी धवन कडून धाव बाद झाला. के रबाडाच्या गोलंदाजीवर मयंक अग्रवालने वृद्धिमानला झेलबाद केले. वृद्धिमानने १७ चेंडूत २१ धावा केल्या.कर्णधार हार्दिक पंड्या ७ चेंडूत मात्र १ धाव करत जितेश शर्मा कडून झेलबाद झाला.

११ षटकात गुजरातच्या संघाने ३ गडी बाद ६७ धावा केल्या. १२ व्या षटकात डेविड मिलरला के. रबाडा ने झेलबाद करत माघारी पाठविले. डेविड मिलरने १४ चेंडूत ११ धावा केल्या. के रबडाच्या गोलंदाजीवर संदीप शर्माने राहुल तेवतीयाने झेल बाद केले . तेवतीया ने १३ चेंडूत ११ धावा केल्या. रशीद खानला जितेश शर्माने झेल बाद करत शून्यावर माघारी पाठविले.

साई सुदर्शनने ५० चेंडूत १ षटकार व ५ चौकार लगावत नाबाद अर्धशतक पूर्ण करत एकूण ६४ धावा केल्या. २० षटका अखेरीस गुजरातच्या संघाने ८ गडी बाद १४३ धावा केल्या.

१४४ धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या संघा कडून सलामीस जॉनी बेयरस्टो व शिखर धवन फलंदाजीस मैदानात आले. मोहमद शमीच्या गोलंदाजीवर प्रदीप संगवानने जॉनी बेयरस्टोला झेलबाद करत अवघ्या १ धावावर तंबूत परत पाठविले. शिखर धवनच्या जोडीला आलेल्या भानुका राजपक्ष यांनी आक्रमक फलंदाजी केली. लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर भानुका राजपक्ष पायचीत झाला. भानुका राजपक्षने २८ चेंडूत १ षटकार व ५ चौकार लगावत ४० धावा केल्या.

शिखर धवनने ५३ चेंडूत १ षटकार व ८ चौकार लगावत अर्धशतक पूर्ण करत नाबाद ६२ धावा केल्या. लियाम लिविंगस्टोनने धडाकेबाज फलंदाजी केली. लियामने १० चेंडूत २ चौकार व ३ षटकार लगावत नाबाद ३० धावा केल्या.पंजाबचा संघाचा ८ गडी राखून विजय झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या