IPL-2022 : पंजाबचा बंगळुरूवर विजय

IPL-2022 : पंजाबचा बंगळुरूवर विजय

मुंबई | वृत्तसंस्था (Mumbai )

मुंबईतील बेब्रॉन स्टेडियमवर आयपीएल-२०२२ ( IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज रॉयल चॅॅलेन्जर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज ( Royal Challengers Bangalore Vs Punjab Kings ) यांच्यात खेळण्यात आला. यात पंजाबच्या संघाने बाजी मारली.

बेंगलोरच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या संघाकडून सलामीला जॉनी बेरस्टो व शिखर धवन फलंदाजीस आले.सामन्याच्या पाचव्या षटकात ग्लेन मॅॅक्स्वेलने शिखर धवनला क्लीन बोल्ड केले. शिखर धवनने १५ चेंडूत २१ धावा केल्या. भानुका राजपक्ष ३ चेंडूत १ धाव करत हर्शल पटेल कडून झेल बाद झाला. मोहमद सिराज ने जॉनी बेरस्टोला झेल बाद केले जॉनी बेरस्टोने २९ चेंडूत ६६ धावा केल्या. मयंक अग्रवाल १९ धावा करत हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर हसरंगा कडून झेल बाद झाला. जितेश शर्माने ९ धावा, हरप्रीत ब्रार ७ धावा तर राहुल चाहर २ धावांवर बाद होत तंबूत परतले. लियाम लिविंगस्टोनने धडाकेबाज फलंदाजी करत ४२ चेंडूत ७० धावा केल्या. हर्शल पटेलच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने लियामला झेल बाद केले.२० व्या षटका अखेर पंजाबच्या संघाने ९ गडी बाद २०९ धावा केल्या.

पंजाबच्या संघाने दिलेल्या २१० धावांचे आव्हान पार करताना बेंगलोरच्या संघाकडून सलामीस विराट कोहली व फाफ डूप्लेसी फलंदाजीसाठी मैदानात आले.चौथ्या षटकात रबाडाच्या गोलंदाजीवर राहुल चहर ने विराटला २० धावांवर झेल बाद केले.जितेश शर्माने डूप्लेसीला झेल बाद करत १० धावांवर माघारी पाठविले. महिपाल लोमरोर ६ धावांवर शिखर धवन कडून झेल बाद झाला. शिखर धवनने महिपाल लामरोरला ६ धावांवर झेल बाद केले. राहुल चहरच्या गोलंदाजीवर शिखर धवनने रजतला झेल बाद केले रजत पाटीदारने २१ चेंडूत २६ धावा केल्या. अर्शदीप सिंघने ग्लेन मॅॅक्स्वेलला झेल बाद केले. ग्लेन मॅॅक्स्वेलने २२ चेंडूत ३२ धावा केल्या. भानुका राजपक्षने दिनेश कार्तिकला ११ धावांवर झेल बाद केले.पाठोपाठ शाहबाज अहमद ९ धावा करत तंबूत परतला.मयंक अग्रवालने हसरंगाला अवघ्या १ धावांवर झेल बाद केले.

२० व्या षटका अखेर बेंगलोरच्या संघाने ९ गडी बाद १५५ धावा केल्या. पंजाबचा बेंगलोरच्या संघावर ५४ धावांनी विजय झाला.

Related Stories

No stories found.