IPL-2022 : पंजाबचा बंगळुरूवर विजय

IPL-2022 :  पंजाबचा बंगळुरूवर विजय

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

आयपीएलच्या ( IPL-2022 ) पंधराव्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्ज (Royal Challengers Bangalore Vs Punjab Kings )यांच्यातील क्रिकेटचा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर खेळला गेला. आजच्या सामन्यात पंजाब च्या संघाने बाजी मारली .

पंजाब किंग्जच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून सलामीला डूप्लेसी व अनुज रावत यांची जोडी फलंदाजी साठी मैदानात आली. सलामीवीर अनुज रावत सातव्या षटकात राहुल चाहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 21 धावा केल्या. रावत नंतर विराट कोहली मैदानात आला. विराट कोहली आणि डूप्लेसी यांनी धावसंख्या वाढविली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार डूप्लेसीने आज चांगली खेळी केली, त्याने ५७ चेंडूत ८८ धावांचे योगदान संघासाठी दिले. अर्शदीपसिंहच्या गोलंदाजीवर शाहरुख खानने झेल घेत डूप्लेसीला बाद केले. अखेर च्या षटकात विराट कोहली नाबाद ४१ धावा व दिनेश कार्तिक नाबाद ३२ धावसंख्ये पर्यंत पोहचले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघांने २०५ धावा ३ गडी बाद अशी झाली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने दिलेल्या २०६ धावांच्या आव्हानास सुरवात करताना पंजाबच्या संघाकडून कर्णधार मयंक अग्रवाल व शिखर धवन फलंदाजी साठी मैदानात आले . हसरंगाच्या गोलंदाजीवर शाहबाज अहमदने झेल घेत मयंक अग्रवालला ३२ धावांवर माघारी पाठविले .

मयंक अग्रवाल नंतर भानुका राजपक्ष मैदानात आल्यानंतर मोहंमद सिराजच्या गोलंदाजीवर शहाबाज अहमद ने ४३ धावांवर झेलबाद केले . त्यापाठोपाठ राज बावाही पायचीत होत शून्यावर माघारी परतला. पाठोपाठ लियाम लिविंगस्टोन १९ धावांवर झेलबाद झाला त्याला अनुज रावत ने झेल बाद केले. सोळा षटकात १६२ धावावर ५ गडी बाद अशी धाव संख्या पंजाब ची झाली होती .

ओडियन स्मिथ व शाहरुख खानने शानदार फलंदाजी करत पंजाबच्या संघाला विजयाचे लक्ष दिले. ओडियन स्मिथ ८ चेंडूत २५ धावा केल्या त्यात ३ षटकार व १ चौकार लगावत संघाला विजय प्राप्त करून दिला .

Related Stories

No stories found.