IPL-2022 : मुंबईचा राजस्थानवर विजय

IPL-2022 : मुंबईचा राजस्थानवर विजय

मुंबई | प्रतिनिधी ( Mumbai )

मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियम वर आयपीएल-२०२२ ( IPL-2022 ) चा क्रिकेटचा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळण्यात आला. यात मुंबईच्या संघाने बाजी मारली.

मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.राजस्थानच्या संघाकडून सलामीला देवदत्त पडीक्क्ल व जोस बट्लर फलंदाजीसाठी मैदानात आले. ऋतिक शोकीनच्या गोलंदाजीवर किराॅॅन पोलार्डने देवदत्त पडीक्क्लला झेलबाद करत राजस्थानच्या संघास पहिला धक्का दिला. देवदत्तने १५ चेंडूत ३ चौकार लगावत १५ धावा केल्या. कुमार कार्तिकेयच्या गोलंदाजीवर टीम डेव्हिड ने कर्णधार संजू सॅॅॅॅमसनला झेलबाद केले. संजू सॅॅॅॅमसनने ७ चेंडूत २ षटकार लगावत १६ धावा केल्या.

रोहित शर्मा ने डॅॅरियल मिशेलला १७ धावांवर झेलबाद केले. जोस बट्लरने ५२ चेंडूत ४ षटकार व ५ चौकार लगावत अर्धशतक पूर्ण करत एकून ६७ धावा केल्या. ऋतिक शोकीनच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने जोसला झेल बाद केले. रवींद्रचंद्रन अश्विनने ९ चेंडूत १ षटकार व ३ चौकार लगावत २१ धावा करत ईशान किशन कडून झेलबाद झाला. राजस्थानच्या संघाने २० षटकाअखेर ६ गडी बाद १५८ धावा केल्या.

राजस्थानने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाकडून सलामीला ईशान किशन व कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीस आले. डॅॅरियल मिचेलने कर्णधार रोहित शर्माला अवघ्या २ धावांवर झेलबाद करत तंबूत परत पाठविले. संजू सॅॅमसनने ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर ईशान किशनला झेलबाद केले. ईशानने १८ चेंडूत २६ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ३९ चेंडूत २ षटकार व ४ चौकार लगावत अर्ध शतक पूर्ण करत एकूण ५१ धावा केल्या .टिळक वर्मा ने ३० चेंडूत ३५ धावा करत रियान परागकडून झेल बाद झाला. टिम डेविडने आक्रमक फलंदाजी करत ९ चेंडूत २० धावा केल्या तर डॅॅनियल सॅॅम्सने मैदानात येताच विजयी षटकार लगावत मुंबईच्या संघास विजय मिळवून दिला.

Related Stories

No stories found.