IPL-2022 : मुंबईचा गुजरातवर विजय

IPL-2022 :  मुंबईचा गुजरातवर विजय

मुंबई | वृत्तसंस्था ( Mumbai )

मुंबईतील बेब्रॉन स्टेडियम वर आयपीएल-२०२२(IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Mumbai Indians Vs Gujrat Titans ) यांच्यात खेळला गेला. यात मुंबईच्या संघाने बाजी मारली.

गुजरातच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या संघाकडून सलामीस कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन फलंदाजीस आले. सलामीच्या फलंदाजांंनी धडाकेबाज फलंदाजीस सुरवात केली.

रशीद खानच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा पायचीत झाला.रोहित शर्माने २८ चेंडूत २ षटकार व ५ चौकार लगावत एकून ४३ धावा केल्या. अल्जारी जोसेफच्या गोलंदाजीवर रशीद खानने ईशान किशनला झेलबाद केले.ईशान किशनने २९ चेंडूत १ षटकार व ५ चौकार झळकवित एकून ४५ धावा केल्या.प्रदीप संगवानच्या गोलंदाजीवर रशीद खानने सूर्यकुमार यादवला झेल बाद करत १३ धावांवर तंबूत पाठविले.रशीद खानने किरॉन पोलार्डला ४ धावांवर क्लीन बोल्ड केले.टिम डेविडने २१ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. २० व्या षटका अंती मुंबईच्या संघाने ६ गडी बाद १७७ धावा केल्या.

मुंबईच्या संघाने दिलेल्या १७८ धावांचे आव्हान स्वीकारत गुजरातच्या संघाकडून वृद्धिमान शहा व शुभमन गिल प्रथम फलंदाजीस आले. गुजरातच्या सलामीवीरांनीही मुंबईच्या संघाबरोबरीने धडाकेबाज फलंदाजीस सुरवात केली.

तेराव्या षटकात मुरगन अश्विनच्या गोलंदाजीवर किरॉन पोलार्डने शुभमन गिलला झेलबाद केले. शुभमन गिलने ३६ चेंडूत २ षटकार व ६ चौकार लगावत अर्धशतक पूर्ण करत एकून ५२ धावा केल्या. पाठोपाठ डॅनियल सॅम्स ने वृद्धिमान शहाला झेल बाद केले. वृद्धिमान शहाने ४० चेंडूत २ षटकार व ६ चौकार झळकवत अर्धशतक पूर्ण करत एकून ५५ धावा केल्या.के. पोलार्डच्या गोलंदाजीवर साई सुदर्शन १४ धावांवर बाद होत माघारी परतला. राहुल तेवतीया अवघ्या ३ धावांवर धाव बाद झाला. डेविड मिलरने १४ चेंडूत १९ धावा केल्या.

२०व्या षटका अखेरीस चेन्नईच्या संघाने ५ गडी बाद १७२ धावा केल्या. मुंबईचा संघ ५ धावांनी विजयी झाला.

Related Stories

No stories found.