Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याIPL-2022 : मुंबईचा चेन्नईवर विजय

IPL-2022 : मुंबईचा चेन्नईवर विजय

मुंबई | वृत्तसंस्था ( Mumbai )

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल-२०२२( IPL-2022)चा क्रिकेटचा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Mumbai Indians Vs Chennai Super Kings ) यांच्या खेळला गेला.यात मुंबईच्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघा कडून सलामीला ऋतुराज गायकवाड व डेव्हन काॅॅन्वे फलंदाजीस मैदानात आले. सामन्याच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डॅॅनियल सॅॅम्सच्या गोलंदाजीवर डेव्हन काॅॅन्वे शून्यावर पायचीत झाला. पाठोपाठ चौथ्या चेंडूवर ऋतिक शोकीनने मोईन अलीला झेलबाद करत शून्यावर माघारी पाठविले.

रॉबिन उथापा अवघ्या १ धावावर पायचीत होऊन तंबूत परतला. ऋतुराज गायकवाडला ईशान किशनने झेलबाद केले ऋतुराजने ६ चेंडूत ६ धावा केल्या.अवघ्या पाचव्या षटका पर्यंत चेन्नईच्या संघाचे ४ गडी बाद झाले. सहाव्या षटकात ईशान किशन ने अंबाती रायडूला झेल बाद केले. अंबाती रायडूने १४ चेंडूत १० धावा केल्या. रायली मेरेडिथच्या गोलंदाजीवर ईशान किशनने शिवम दुबेला झेल बाद केले.शिवम दुबेने ९ चेंडूत १० धावा केल्या.इवेन ब्राव्हो १५ चेंडूत १२ धावा करत टिळक वर्मा कडून झेल बाद झाला.महेश दिक्शाना शून्यावर तंबूत परतला. महेंद्रसिंह धोनीने ३३ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या. सोळाव्या षटकाअखेर चेन्नईच्या संघाचे सर्व गडी बाद ९७ धावा झाल्या.

मुंबईच्या संघाकडून प्रथम ईशान किशन व रोहित शर्माची जोडी फलंदाजीस मैदानात आली. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूत ईशान किशनला महेंद्रसिंह धोनी ने झेल बाद केले. ईशान किशनने ५ चेंडूत ६ धावा केल्या. सिमरजीत सिंगच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनीने रोहित शर्माला झेल बाद केले. रोहित शर्माने १४ चेंडूत १८ धावा केल्या. ६ चेंडूत १ धाव करत डॅॅनियल सॅॅम्स मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. स्ट्रीस्टन टब्ज मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर शून्यावर पायचीत झाला. मोईन अलीने ऋतिक शौकीनला १८ धावांवर क्लीन बोल्ड केले. टिम डेविडने ७ चेंडूत नाबाद १६ धावा केल्या तर टिळक वर्माने ३२ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या.

मुंबईच्या संघाने १५ व्या षटकात ५ गडी बाद १०३ धावा करत चेन्नईच्या संघावर ५ गडी राखून विजय मिळवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या