IPL-2022 : लखनौचा पंजाबवर विजय

IPL-2022 :  लखनौचा पंजाबवर विजय

पुणे | प्रतिनिधी (Pune )

पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आयपीएल २०२२ (IPL-2022 ) चा क्रिकेटचा सामना लखनौ सुपर जायंट्स व पंजाब सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला . यात लखनौच्या संघाने बाजी मारली.

पंजाबच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या संघाकडून सलामीला क्विंटन डी कॉक व कर्णधार लोकेश राहुल फलंदाजीस आले. रबडाच्या गोलंदाजीवर जितेश शर्माने कर्णधार लोकेश राहुलला झेलबाद करत लखनौच्या संघास पहिला धक्का दिला. लोकेश अवघ्या ६ धावांवर तंबूत परतला. संदीप शर्माच्या च्या गोलंदाजीवर जितेश शर्मा ने क्विंटन डी कॉकला झेलबाद केले. डी कॉक३ ७ चेंडूत ४६ धावा केल्या.

दीपक हुड्डा २८ चेंडूत ३४ धावा करत धावबाद झाला. कृणाल पंड्या अवघ्या ७ धावा करत शिखर धवनकडून झेलबाद झाला.आयुष बडोनी ४ तर जेसन होल्डर ११ धावांवर तंबूत परतले. दुष्मंता चमिरा १० चेंडूत १७ धावा करत राहुल चाहर कडून झेलबाद झाला. मोहसीन खान ने ६ चेंडूत १३ धावा केल्या.२० व्या षटका अखेरीस लखनौच्या संघाने ८ गडी बाद १५३ धावा केल्या.

लखनौच्या संघाने दिलेल्या १५४ धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाकडून सलामीला मयंक अग्रवाल व शिखर धवन फलंदाजीस मैदानात आले. दुष्मंता चामिराच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल ने मयंक अग्रवालला झेलबाद करत पंजाबच्या संघाला पहिला धक्का दिला. मयंक ने १७ चेंडूत २५ धावा केल्या.रवी बिश्नोईने शिखर धवनला क्लीन बोल्ड केले. शिखर धवनने १५ चेंडूत अवघ्या ५ धावा केल्या.

लियाम लिविंगस्टोन १६ चेंडूत १८ धावा करत झेल बाद झाला. भानुका राजपक्षला लोकेश राहुलने अवघ्या ९ धावांवर झेल बाद केले. कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर जितेश शर्मा पायचीत होऊन अवघ्या २ धावांवर तंबूत परतला.दुष्मंता चामिराच्या गोलंदाजीवर कृणाल पंड्याने जॉनी बेअरस्टोला झेल बाद केले. जॉनी बेअरस्टोने २८ चेंडूत ३२ धावा केल्या. मोहसीन खानच्या गोलंदाजीवर आयुष बडोनीने राहुल चाहरला झेल बाद करत अवघ्या ४ धावांवर माघारी पाठविले. पंजाबचा संघ २० षटकात 8 गडी बाद 133 धावा करू शकला.

Related Stories

No stories found.