IPL-2022 : लखनौचा मुंबईवर विजय

IPL-2022 : लखनौचा मुंबईवर विजय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबईतील वानखेडे मैदानावर आयपीएल-२०२२ ( IPL-2022 )चा क्रिकेटचा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स ( Mumbai Indians Vs Lucknow Super Giants ) यांच्यात खेळला गेला. यात लखनौच्या संघाने बाजी मारली.

मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या संघाकडून सलामीला क्विंटन डी कॉक व लोकेश राहुल फलंदाजीस आले. जसप्रीतच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने डी कॉकला झेल बाद करत लखनौच्या संघास पहिला धक्का दिला. डी कॉकने ९ चेंडूत १० धावा केल्या. डी कॉक नंतर मनीष पांडे फलंदाजीस मैदानात आला. मनीष पांडे २२ चेंडूत २२ धावा करत झेल बाद झाला.

सलामीवीर लोकेश राहुलने आक्रमक फलंदाजी केली. मार्क स्टोनिस शून्यावर झेलबाद तर, कृणाल पंड्या १ धाव घेऊन झेलबाद झाले. दीपक हुड्डाला डेवाल्ड ब्रेवीसने झेल बाद केले.दीपक हुड्डा ने ९ चेंडूत १० धावा केल्या.लोकेश राहुलने धडाकेबाज फलंदाजी करत धावांचे शतक पूर्ण केले. लोकेश ने ६२ चेंडूत १०३ धावा केल्या. लखनौ च्या संघाने २० षटका अखेरीस ५ गडी बाद १६८ धावा केल्या.

लखनौच्या संघाने दिलेल्या १६९ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाकडून रोहित शर्मा व ईशान किशन प्रथम फलंदाजीस आले. ईशान किशन २० चेंडूत फक्त ८ धावा करत जेसन होल्डर कडून झेल बाद झाला.डेवाल्ड ब्रेवीसला दुष्मंता चमिरा ने झेलबाद करत अवघ्या ३ धावांवर तंबूत परत पाठविले.रोहित शर्माने ३१ चेंडूत ३९ धावा करत कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पाठोपाठ सूर्यकुमार यादवला लोकेश राहुलने ७ धावांवर झेलबाद करत माघारी पाठविले. १२ व्या षटकात मुंबईच्या संघाची ४ गडी बाद ६८ धावा अशी धावसंख्या झाली होती. टिळक वर्मा ने २७ चेंडूत ३८ धावा केल्या.रवी बिश्नोईने टिळक वर्माला झेल बाद केले. २०व्या षटका अखेर मुंबईचा संघ ८ गडी बाद १३२ धावांपर्यंत पोहचू शकला.

Related Stories

No stories found.