
पुणे | वृत्तसंस्था (Pune)
पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आयपीएल २०२२ ( IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. यात लखनौच्या संघाने बाजी मारली.
कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.लखनौच्या संघाकडून सलामीस लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक फलंदाजीस आले.श्रेयस अय्यरने लोकेश राहुलला शून्यावर धावचीत करत लखनौच्या संघाला पहिल्या षटकातच धक्का दिला.
सलामीला आलेला क्विंटन डी कॉकने धडाकेबाज फलंदाजीस सुरवात केली. आठव्या षटकात सुनील नारायणच्या गोलंदाजीवर शिवम मावीने डी कॉकला झेल बाद केले. डी कॉकने २९ चेंडूत ३ षटकार व ४ चौकार लगावत अर्धशतक करत एकून ५० धावा केल्या. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने दीपक हुड्डाला झेल बाद केले.दीपक हुड्डाने तुफान फटकेबाजी करत २७ चेंडूत २ षटकार व ४ चौकार झळकवत एकून ४१ धावा केल्या.
पंधराव्या षटकात अॅॅरन फिंचने कुणाल पंड्याला झेल बाद केले. कुणालने २७ चेंडूत २५ धावा केल्या.मार्क्स स्टॉइनिसने १४ चेंडूत २८ धावा करत श्रेयस अय्यर कडून झेल बाद झाला.बाबा इंद्रजीतने दुष्मंत चमिराला धावचीत करत शून्यावर तंबूत पाठविले. लखनौच्या संघाने २० व्या षटका अखेरीस ७ गडी बाद १७६ धावा केल्या.
लखनौच्या संघाने दिलेल्या १७७ धावांचे आव्हान स्वीकारत कोलकाताच्या संघाकडून सलामीस बाबा इंद्रजीत व अॅॅरन फिंच फलंदाजीस आले.पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूत मोहसीन खानच्या गोलंदाजीवर आयुष बडोनीने बाबा इंद्रजीतला झेल बाद करत शून्यावर तंबूत पाठवत कोलकाताच्या संघाला पहिला धक्का दिला.
श्रेयस अय्यरला आयुष बडोनीने अवघ्या ६ धावांवर झेलबाद केले. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर डी.कॉकने अॅॅरन फिंचला झेलबाद केले. अॅॅरन फिंचने १४ चेंडूत १४ धावा केल्या. आवेश खानने नितीश राणाला क्लीन बोल्ड करत अवघ्या २ धावांवर माघारी पाठविले. रिंकू सिंग ६ धावांवर बाद झाला.
आंद्रे रसेलने धडाकेबाज फलंदाजी केली.आवेश खानच्या गोलंदाजीवर जेसन होल्डरने आंद्रे रसेलला झेल बाद केले. आंद्रे रसेलने १९ चेंडूत ५ षटकार व ३ चौकार लगावत एकून ४५ धावा केल्या. सुनील नारायणने १२ चेंडूत २२ धावा केल्या.अनुकूल रॉय,टिमोथी साउथी,हर्षित राणा एका पाठोपाठ बाद झाले.
१५ व्या षटकातच कोलकाताच्या संघाचे सर्व गडी बाद झाले. कोलकाताच्या संघाने सर्व गडी बाद १०१ धावा केल्या. लखनौच्या संघाचा ७५ धावांनी विजय झाला.