IPL-2022 : कोलकात्याचा हैदराबादवर विजय

IPL-2022 : कोलकात्याचा हैदराबादवर विजय

पुणे | वृत्तसंस्था ( Pune )

पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम वर आयपीएल-२०२२ ( IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सन रायजर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders Vs Sunrisers Hydrabad ) यांच्यात खेळण्यात आला. यात कोलकात्याच्या संघाने बाजी मारली.

कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघाकडून सलामीला व्यंकटेश अय्यर व अजिंक्य राहणे फलंदाजीस आले. सामन्याच्या दुसऱ्या षटकात मार्को यान्सिनने व्यंकटेश अय्यरला ७ धावांवर क्लीन बोल्ड केले. उमरान मलिकच्या गोलंदाजीवर शशांक सिंगने नितीश राणाला झेल बाद केले. नितीश राणाने १६ चेंडूत ३ षटकार व १ चौकार लगावत एकूण २६ धावा केल्या. अजिंक्य रहाणेने २४ चेंडूत २८ धावा केल्या. अजिंक्य राहणेला झेल बाद केले. उमरान मलिकच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीने श्रेयस अय्यरला झेल बाद केले. श्रेयस अय्यरने ९ चेंडूत १५ धावा केल्या. रिंकू सिंग ५ धावांवर पायचीत झाला.एस बिलिंग्ज्सने २९ चेंडूत ३४ धावा केल्या.२० व्या षटका अखेर कोलकाताच्या संघाने ६ गडी बाद १७७ धावा केल्या.

कोलकाताच्या संघाने दिलेल्या १७८ धावांचे आव्हान स्वीकारत हैदराबादच्या संघा कडून प्रथम अभिषेक शर्मा व केन विल्मयसन फलंदाजीसाठी मैदानात आले . आंद्रे रसेलने केन विल्यमसनला ९ धावांवर क्लीन बोल्ड करत हैद्रबादच्या संघास पहिला धक्का दिला. टिमोथी साउथीने राहुल त्रिपाठीला ९ धावांवर झेल बाद केले. अभिषेक शर्माने २८ चेंडूत ४३ धावा केल्या. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर सम बिलिंग्जने अभिषेकला झेल बाद केले. सुनील नारायनने निकोलस पुरणला २ धावांवर तंबूत परत पाठविले. एडन मार्करम ने २५ चेंडूत ३२ धावा केल्या. व्ही. सुंदरला व्यंकटेश अय्यरने ४ धावांवर झेल बाद केले.मार्को यान्सिन १ धाव घेऊन झेलबाद होत माघारी परतला.

हैदराबादच्या संघ २०व्या षटका अखेरीस ८ गडी बाद १२३ धावा करू शकला. कोलकाताने हैदराबादच्या संघावर ५४ धावांनी विजय मिळविला.

Related Stories

No stories found.