IPL-2022 : हैदराबादचा मुंबईवर विजय

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | वृत्तसंस्था ( Mumbai )

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल-२०२२ ( IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians Vs Sunrisers Hydrabad ) यांच्यात खेळण्यात आला. यात हैदराबादच्या संघाने बाजी मारली.

मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या संघाकडून सलामीस अभिषेक शर्मा व प्रियम गर्ग फलंदाजीसाठी मैदानात आले. डॅॅनियेल सॅॅम्सच्या गोलंदाजीवर मयंक मारकंडेने अभिषेक शर्माला झेल बाद केले.अभिषेक शर्माने १० चेंडूत ९ धावा केल्याप्रियम गर्गने २६ चेंडूत ४२ धावा केल्या. रमणदीप सिंघने प्रियमला झेल बाद केले. रायली मेरेडिथच्या गोलंदाजीवर मयंक मारकंडेने निकोलस पुरणला झेल बाद करत हैदराबादच्या संघास तिसरा धक्का दिला. निकोलस पुरणने २२ चेंडूत ३८ धावा केल्या. राहुल त्रिपाठीने धडाकेबाज फलंदाजी करत ४४ चेंडूत ७६ धावा केल्या. टिळक वर्माने राहुल त्रिपाठीला झेल बाद केले. एडन मार्करम अवघ्या २ धावत तंबूत परतला. २० व्या षटका अखेर हैदराबादच्या संघाने ६ गडी बाद १९३ धावा केल्या.

हैदराबादच्या संघाने दिलेल्या १९४ धावांचे आव्हान स्वीकारत मुंबईच्या संघाकडून रोहित शर्मा व ईशान किशनची प्रथम फलंदाजीस आले.मुंबईच्या संघाच्या सलामीच्या जोडीने धडाकेबाज फलंदाजी केली. रोहित शर्माने ३६ चेंडूत ४८ धावा करत अकराव्या षटकात झेल बाद झाला. प्रियम गर्गने ईशान किशनला झेल बाद केले .ईशान किशनने ३४ चेंडूत ४३ धावा केल्या. उमराण मलिकच्या गोलंदाजीवर केन विल्यमसनने टिळक वर्माला ८ धावांवर झेल बाद केले. उमरान मलिकच्या गोलंदाजीवर प्रियम गर्गने डॅॅनियेल सॅॅम्सला झेल बाद केले डॅॅनियेल सॅॅम्सने ११ चेंडूत १५ धावा केल्या.

टिम डेविडने आक्रमक फलंदाजी केली. डेविडच्या धडाकेबाज फलंदाजीने मुंबईचा संघ विजयाच्या वाटेवर असतानाच टी. नटराजनने टिम डेविडला धावचीत केले. टिम डेविडने १८ चेंडूत ४६ धावा केल्या. डेविड बाद झाल्या नंतर संजय यादव शून्यावर तंबूत परतला.विसाव्या षटका अखेरीस मुंबईचा संघ ७ गडी बाद १९० धावां करू शकला. हैदराबादच्या संघाने मुंबईच्या संघावर ३ धावांनी विजय मिळविला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *