IPL-2022 : हैदराबादचा गुजरातवर विजय

IPL-2022 : हैदराबादचा गुजरातवर विजय

मुबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबईतील डॉ. डी.वाय.पाटील मैदानावर आयपीएल -२०२२ ( IPL-2022 ) चा क्रिकेट सामना सन रायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hydrabad ) विरुद्ध गुजरात टायटन्स ( Gujrat Titans )यांच्यात खेळला गेला.यात हैदरा्बादच्या संघाचा विजय झाला.

हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या संघाकडून सलामीला मॅॅथ्यू वेड व शुभमन गिल फलंदाजीस आले. शुभमन गिलला राहुल त्रिपाठीला झेल बाद केले. शुभमन ने ९ चेंडूत ७ धावा केल्या. नटराजनच्या गोलंदाजीवर विल्यमसन ने साई सुदर्शनला झेल बाद केले.

साई सुदर्शनने ९ चेंडूत २ चौकार झळकवत ११ धावा केल्या . मॅॅथ्यू वेडला उमराण मलिक ने पायचीत केले. मॅॅथ्यूने १९ चेंडूत १९ धावा केल्या. त्यानंतर कप्तान हार्दिक पंड्या फलंदाजीस मैदानात आला. अभिषेक शर्माने डेविड मिलर ला झेलबाद केले.

डेविड ने १५ चेंडूत १२ धावा केल्या . राहुल तेवतिया ने ६ धावा केल्या तर रशीद खान शून्यावर बाद झाला. हार्दिक पंड्याने नाबाद अर्धशतक पूर्ण केले ४२ चेंडूत ४ चौकार व एक षटकाराचा समावेश करत ५० धावाहार्दिक पंड्याने केले. २० षटका अखेर गुजरातच्या संघाने ७ गडी बाद १६२ धावा केल्या.

गुजरातच्या संघाने दिलेल्या १६३ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाकडून सलामीला केन विल्यमसन व अभिषेक शर्मा फलंदाजीस आले. अभिषेक शर्माने ३२ चेंडूत ६ चौकार लगावत ४२ धावा केल्या.रशीद खानच्या गोलंदाजीवर साई सुदर्शनने अभिषेकला झेलबाद केले. अभिषेक बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी फलंदाजी साठी मैदानात आला. राहुल त्रिपाठी ने ११ चेंडूत सतरा धावा केल्या दुखापती मुळे रिटायड हर्ट झाला. निकोलस पूरणने १७ चेंडूत २ चौकार व शेवटचा एक षटकार लगावत बिनबाद २८ धावा करत हैद्रबादच्या संघास विजय प्राप्त करून दिला.

Related Stories

No stories found.