IPL-2022 : हैदराबादचा बंगळुरूवर विजय

IPL-2022 :  हैदराबादचा बंगळुरूवर विजय

मुंबईतील ब्रेब्रॉन मैदानावर आयपीएल-२०२२ ( IPL-2022 )चा क्रिकेटचा सामना रॉयल चॅॅलेन्जेर्स बेंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Royal challengers Banglore Vs Sunrisers Hydrabad ) यांच्यात खेळला गेला. यात हैदराबादच्या संघाने बाजी मारली.

हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेंगलोरच्या संघाकडून सलामीला विराट कोहली व फाफ डूप्लेसी फलंदाजीसाठी मैदानात आले. बेंगलोरच्या संघाची फलंदाजीस खराब सुरवात झाली.मैदानात येताच विराट कोहली शून्यावर बाद झाला. पाथोपाठ मार्को यान्सिंन ने डूप्लेसीला क्लीन बोल्ड केले.

डूप्लेसीने ७ चेंडूत अवघ्या ५ धावा केल्या. त्यानंतर बेंगलोरच्या संघाच्या फलंदाजांंची बाद होण्याची शृंखला सुरु झाली. अनुज रावत शून्यावर ,सुयश प्रभुदेसाई १५ धावा तर शाहबाज अहमद ७ धावा , तर दिनेश कार्तिक शून्यावर तंबूत परतले. ११व्या षटका अखेर बंगलोरच्या संघाची ७ गडी बाद ५५ धावा झाल्या. हर्षल पटेल ४ धावा तर हसरंगा ८ धावांवर तंबूत परतले. १६व्या षटकात सर्व गडी बाद ६८ धावां बेंगलोरच्या संघाने केल्या .

हैदराबादच्या संघाकडून अभिषेक वर्मा व केन विल्यमसन सलामीला फलंदाजीस आले. अभिषेक वर्माने २८ चेंडूत ८ चौकार व १ षटकार लगावत ४७ धावा केल्या. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर अनुज रावत ने अभिषेकला झेल बाद केले. केन विल्यमसनने १७ चेंडूत नाबाद १६ धावा केल्या तर राहुल त्रिपाठीने ३ चेंडूत नाबाद ७ धावा करत संघाला विजय प्राप्त करून दिला .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com