IPL-2022 : गुजरातचा लखनौवर विजय

IPL-2022 :  गुजरातचा लखनौवर विजय

पुणे | वृत्तसंस्था ( Pune )

पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम वर आयपीएल-२०२२ (IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Lucknow Super Giants Vs Gujrat Titans ) यांच्यात खेळला गेला. यात गुजरातच्या संघाने बाजी मारली.

गुजरातच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या संघाकडून सलामीला वृद्धिमान शहा व शुभमन गिल फलंदाजीस आले.मोहसीन खानच्या गोलंदाजीवर आवेश खानने वृद्धिमान शहाला झेल बाद करत गुजरातच्या संघाला पहिला धक्का दिला. वृद्धिमान शहाने ५ धावा केल्या.क्विंटन डी. कॉक ने मॅॅथ्यु वेडला १० धावांवर झेलबाद करत माघारी पाठविले. हार्दिक पंड्या १३ चेंडूत ११ धावा करत क्विंटन डी. कॉक कडून झेल बाद झाला. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर आयुष बडोनीने डेविड मिलरला झेल बाद करकेले. डेविड मिलरने २४ चेंडूत २६ धावा केल्या. राहुल तेवतीया ने १६ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या. तर शुभमन गिलने ४९ चेंडूत ७ चौकार लगावत नाबाद ६३ धावा केल्या. २० व्या षटकाअखेरीस गुजरातच्या संघाने ४ गडी बाद १४४ धावा केल्या.

गुजरातच्या संघाने दिलेल्या १४५ धावांचे आव्हान लखनौच्या संघाला दिले. लखनौच्या संघाकडून प्रथम क्विंटन डी. कॉक व लोकेश राहुल फलंदाजीस आले.यश दयालच्या गोलंदाजीवर आर श्रीनिवासन ने डी.कॉकला झेल बाद केले. डी कॉकने १० चेंडूत ११ धावा केल्या. मोहमद शमीच्या गोलंदाजीवर वृद्धिमान शहाने लोकेश राहुलला झेल बाद केले. लोकेश राहुलने १६ चेंडूत ८ धावा केल्या. डेविड मिलरने करण शर्माला ४ धावांवर झेल बाद केले. कृणाल पंड्या अवघ्या ५ धावांवर वृद्धिमान शहा कडून स्टंप आउट झाला. मार्कस स्टोइनीसला डेविड मिलरने अवघ्या २ धावांवर धावचीत केले. जेसन होल्डर १ धाव तर १ धाव करत तंबूत परतले. आवेश खानला वृद्धिमान शहाने १२ धावांवर झेल बाद केले. .

लखनौच्या संघाच्या खेळाडूंची एकामागून एक गडी बाद होण्याची शृंखला चालूच राहिली. अखेरीस १४ व्या षटकात लखनौच्या संघाचा फलंदाजीचा खेळ आवरला. लखनौच्या संघाने सर्व गडी बाद ८२ धावा केल्या. गुजरातच्या संघाचा ६२ धावांनी विजय झाला.

Related Stories

No stories found.