Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याIPL-2022 : गुजरातचा हैदराबादवर विजय

IPL-2022 : गुजरातचा हैदराबादवर विजय

मुंबई | प्रतिनिधी (Mumbai )

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२( IPL-2022 ) चा क्रिकेटचा सामना सन रायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स (Sunrisers Hydrabad Vs Gujrat Titans ) यांच्यात खेळला गेला. यात गुजरातच्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

गुजरातच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या संघाकडून सलामीला अभिषेक वर्मा व केन विल्यमसन फलंदाजीस आले. मोहमद शमीने केन विल्यमसनला क्लीन बोल्ड करत हैदराबादच्या संघास धक्का दिला. केन विल्यमसनने ८ चेंडूत ५ धावा केल्या. राहुल त्रिपाठी १० चेंडूत १६ धावा करत मोहमद शमीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.सलामीला आलेल्या अभिषेक वर्माने४२ चेंडूत ३ षटकार व ६ चौकार लगावत अर्ध शतक पूर्ण करत ६५ धावा केल्या . अल्जारी जोसेफ ने अभिषेक वर्माला क्लीन बोल्ड केले. पाठोपाठ निकोलस पुरणला शुबमन गिलने झेल बाद केले.निकोलस ने ५ चेंडूत ३ धावा केल्या. एडन मार्करमने ४० चेंडूत ५६ धावा करत अर्धशतक केले. यश दयालच्या गोलंदाजीवर डेविड मिलर ने एडनला झेलबाद केले. २० व्या षटका अखेरीस हैदराबादच्या संघाने ६ गडी बाद १९५ धावा केल्या.

हैदराबादच्या संघाने दिलेल्या १९६ धावांचे आव्हान स्वीकारत गुजरातच्या संघाकडून सलामीला वृधीमान शाह व शुभमन गिल फलंदाजीस आले. उमरान मलिकने शुभमनला क्लीन बोल्ड करत गुजरातच्या संघास धक्का दिला. शुभमनने २४ चेंडूत २२ धावा केल्या. वृधीमान शाहने ३८ चेंडूत ६८ धावा केल्या.उमरान मलिकने वृधीमानला क्लीन बोल्ड केले. कर्णधार हार्दिक पंड्या अवघ्या १० धावाकरून तंबूत परतला. हार्दिकला मार्को यान्सीनने उमरान मलिकच्या गोलंदाजीवर झेल बाद केले. राहुल तेवतीया ने २१ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या तर रशीद खान ने ११ चेंडूत ४ षटकार लगावत नाबाद ३१ धावा केल्या. रशीद खानने शेवटच्या दोन चेंडूवर षटकार लगावत गुजरातच्या संघास विजय प्राप्त करून दिला .

- Advertisment -

ताज्या बातम्या