IPL-2022 : गुजरातचा दिल्लीवर विजय

IPL-2022 :  गुजरातचा दिल्लीवर विजय

पुणे । वृत्तसंस्था Pune

पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर गुजरात टायटन्स (Gujarat Titans )आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (Delhi Capitals)यांच्यात आयपीएल २०२२ चा ( IPL-2022 ) क्रिकेटचा सामना झाला. यात गुजरात टायटन्सच्या संघाने बाजी मारली .

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड गुजरात टायटन्सच्या संघाकडून फलंदाजीस सलामीला मैदानात आले . रिषभ पंत ने मॅथ्यू वेड अवघ्या एक धावावर झेल बाद करीत माघारी पाठविले.

शुभमन गिल व विजय शंकरच्या जोडीने मैदानावर पकड घेत धाव संख्या वाढविली. कुलदीप यादव ने विजय शंकरला क्लीन बोल्ड करीत गुजरातच्या संघास धक्का दिला . विजय शंकरने २० चेंडूत १३ धावा केल्या. पाठोपाठ हार्दिक पंड्या २७ चेंडूत ३१ धावा करीत झेल बाद झाला. शुभमन गिलने ४६ चेंडूत ८४ धावा केल्या . अखेरीस वीस षटकात सहा गडी बाद १७१ धावा गुजरात च्या संघाने केल्या .

गुजरातच्या संघाने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानास दिल्लीच्या संघा कडून पृथ्वी शा‍ॅ‍ॅ व टिम सिफर्ट मैदानात आले . टिम सिफर्ट अवघ्या तीन धावांवर झेल बाद झाला . पाठोपाठ दिल्लीच्या संघाला दुसरा धक्का देत लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर सलामीवीर पृथ्वी शॉला10 धावांवर विजय शंकरने झेलबाद केले.

मनदीप सिंघ ही १६ चेंडूत १८ धावांचे योगदान देत माघारी परतला . पाठोपाठ अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर , मुस्तफिजूर रहमान तंबूत परतले . दिल्लीच्या संघाला गुजरातने दिलेले आव्हान परतविता आले नाही . २० षटकात ९ गडी बाद १७९ धाव संख्येपर्यंत दिल्लीचा संघ पोहचू शकला.

Related Stories

No stories found.