IPL-2022 : दिल्लीचा राजस्थानवर विजय

IPL-2022 :  दिल्लीचा राजस्थानवर विजय

मुंबई | वृत्तसंस्था ( Mumbai )

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय.पाटील स्टेडियमवर आयपीएल-२०२२ (IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कपिटल्स ( Rajasthan Royals Vs Delhi Capitals ) यांच्यात खेळला गेला. यात दिल्लीच्या संघाने बाजी मारली.

दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाकडून सलामीला जोस बट्लर व यशस्वी जयस्वाल फलंदाजीस आले.चेतन साकरियाच्या गोलंदाजीवर शार्दुल ठाकूरने जोस बटलरला झेल बाद करत राजस्थानच्या संघास पहिला धक्का दिला.जोस बट्लरने ११ चेंडूत ७ धावा केल्या. मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर ललित यादवने यशस्वी जयस्वालला झेल बाद केले. यशस्वी जयस्वालने १९ चेंडूत १९ धावा केल्या.

रविचंद्रन आश्विनने ३८ चेंडूत २ षटकार व ४ चौकार लगावत अर्धशतक करत ५० धावांवर बाद झाला. मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नरने रविचंद्रन आश्विनला झेल बाद केले. संजू सॅॅमसन अवघ्या ६ धावांवर तंबूत परतला.रियान पराग ९ धावा करत रोव्ह्मन पॉवेलकडून झेल बाद झाला. देवदत्त पाडीक्क्लने ३० चेंडूत ४८ धावा करत झेल बाद झाला. राजस्थानच्या संघाने २० व्या षटका अखेरीस ६ गडी बाद १६० धावा केल्या.

राजस्थानने दिलेल्या १६१ धावांचे आव्हान स्वीकारत दिल्लीच्या संघाकडून के. एस.भरत व डेविड वॉर्नर प्रथम फलंदाजीस आले. पहिल्या शतकाच्या दुसऱ्या चेंडूत संजू सॅॅमसनने के. एस.भरतला झेल बाद करत दिल्लीच्या संघास पहिला धक्का दिला.

मिचेल मार्शने धडाकेबाज फलंदाजी केली. मिचेलने ६२ चेंडूत ७ षटकार व ५ चौकार लगावत एकूण ८९ धावा केल्या. अठराव्या षटकात युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर कुलदीपसेन ने मिचेल मार्शला झेल बाद केले.ऋषभ पंत ने ४ चेंडूत नाबाद १३ धावा केल्या.

सलामीला आलेल्या डेविड वॉर्नरने ४१ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. सामन्याचे अकरा चेंडू शिल्लक ठेऊन दिल्लीच्या संघाने २ गडी बाद १६१ धावा करत राजस्थानच्या संघावर ८ गडी राखून विजय मिळवला.

Related Stories

No stories found.