IPL-2022 : दिल्लीचा पंजाबवर विजय

IPL-2022 : दिल्लीचा पंजाबवर विजय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबईतील बेब्रॉन मैदानावर आयपीएल-२०२२ ( IPL-2022 ) चा क्रिकेटचा सामना दिल्ली कॅपिटल्स व पंजाब किंग्ज ( Delhi Capitals Vs Punjab Kings )यांच्यात खेळला गेला. यात दिल्लीच्या संघाने बाजी मारली.

दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या संघाकडून सलामीला मयंक अग्रवाल व शिखर धवन फलंदाजीस आले.सलामीवीर शिखर धवन अवघ्या ९ धावांवर तंबूत परतला.ललित यादवच्या गोलंदाजीवर रिषभ पंत ने शिखरला झेलबाद केले.शिखर धवन पाठोपाठ कर्णधार मयंक अग्रवाल १५ चेंडूत २४ धावाकरून तंबूत परतला.मुस्तफिजूर रहमानने मयंकला क्लीन बोल्ड केले.

पाठोपाठ लियाम लिविंगस्टोन अवघ्या २ धावांवर बाद झाला.रिषभ पंतने लियाम ले स्टंप आउट केले. खलील अहमदच्या गोलंदाजीवर जॉनी बेयरस्टो बाद झाला.बेयरस्टो ने अवघ्या ९ धावा केल्या. जितेश शर्मा ने फटकेबाजीस सुरवात करताच अक्षरपटेलने त्याला पायचीत केले.जितेश शर्मा ने २३ चेंडूत ३२ धावा केल्या. पंजाबच्या संघाचे फलंदाज एका मागे एक बाद झाल्याने धाव संख्या काही जास्त काही वाढली नाही. विसाव्या षटका अखेरीस पंजाबचा संघाने सर्व गडी बाद ११५ धावा केल्या.

दिल्लीच्या संघाकडून सलामीला पृथ्वी शाॅॅ व डेविड वॉर्नर फलंदाजीस आले. दिल्लीच्या संघाकडून सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजीस सुरवात केली. अवघ्या ५ षटकात बिनबाद ७५ धावा झाल्या. राहुल चाहर च्या गोलंदाजीवर नॅॅथन एलीसने पृथ्वीला झेल बाद करत दिल्लीच्या संघास पहिला धक्का दिला. पृथ्वी शाॅॅ ने २० चेंडूत ७ चौकार व एक षटकार लगावत ४१ धावा केल्या. पृथ्वी नंतर सरफराज खान फलंदाजीसाठी मैदानात आला.सरफराज खानने १३ चेंडूत १२ धावा केल्या. तर डेविड वॉर्नरने ३० चेंडूत १० चौकार व १ षटकार लगावत नाबाद ६० धावा करत दिल्लीच्या संघाला विजय प्राप्त करून दिला.

Related Stories

No stories found.