IPL-2022 : चेन्नईचा दिल्लीवर विजय

IPL-2022 :  चेन्नईचा दिल्लीवर विजय

मुंबई | वृत्तसंस्था ( Mumbai )

नवी मुंबईतील डॉ.डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयपीएल-२०२२( IPL-2022) चा क्रिकेटचा क्रिकेटचा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅॅपिटल्स (Chennai Super Kings Vs Delhi Capitls ) यांच्यात खेळला गेला. यात चेन्नईच्या संघाने बाजी मारली.

दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघाकडून सलामीला ऋतुराज गायकवाड व डेव्हन काॅॅन्वे फलंदाजीस आले. सलामीच्या जोडीने धडाकेबाज फलंदाजीस सुरवात केली.अकराव्या षटकात अक्षर पटेलने ऋतुराज गायकवाडला झेल बाद केले.ऋतुराजने ३३ चेंडूत १ षटकार व ४ चौकार लगावत एकूण ४१ धावा केल्या. खलील अहमदच्या गोलंदाजीवर रिषभपंत ने डेव्हन काॅॅन्वेला झेल बाद केले. डेव्हन काॅॅन्वेने ४९ चेंडूत ५ षटकार व ७ चौकार लगावत ८७ धावा केल्या.

डेविड वॉर्नरने शिवमदुबेला ३२ धावांवर झेल बाद केले.खलील अहमदच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने अंबाती रायडूला अवघ्या ५ धावांवर बाद केले.मोईन अली ९ धावाकरत डेविड वॉर्नरकडून झेल बाद झाला. चेन्नईच्या संघाने २० षटका अखेरीस ६ गडी बाद २०८ धावा केल्या.

चेन्नईच्या संघाने दिलेल्या २०९ धावांचे आव्हान स्वीकारत दिल्लीच्या संघाकडून डेविड वॉर्नर व के.एस. भरत प्रथम फलंदाजीस आले. दुसऱ्या षटकात मोईन अली के.एस. भरतला ८ धावांवर झेलबाद करत दिल्लीच्या संघाला पहिला धक्का. महेश थीक्षानाच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नर १९ धावा क्क्रून पायचीत झाला .

मोईन अलीच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाड ने मिचेल मार्शला झेल बाद केले. मार्शने २० चेंडूत २५ धावा केल्या. मोईन अलीने रिषभ पंतला २१ धावांवर क्लीन बोल्ड केले.रिपाल पटेल ६ धावांवर झेल बाद होत तंबूत परतला. मुकेश चौधरीने अक्षर पटेलला अवघ्या १ धावावर क्लीन बोल्ड केले. कुलदीप यादव ५ धावांवर कुलदीप यादवकडून झेल बाद झाला. खलील अहमद शून्यावर बाद झाला.

अठराव्या षटकातच दिल्लीच्या संघाचा खेळ आवरला. दिल्लीच्या संघाने सर्व गडी बाद ११७ धावा केल्या. चेन्नईचा दिल्लीच्या संघावर ९१ धावांनी विजय झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com