Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याIPL- 2022 चेन्नईचा बंगळुरूवर विजय

IPL- 2022 चेन्नईचा बंगळुरूवर विजय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबईच्या डॉ. डी.वाय.पाटील मैदानावर आयपीएल २०२२ ( IPL-2022 )चा क्रिकेटचा सामना रॉयल चॅॅलेंंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Royal Challengers Bangalore Vs Chennai Super Kings) यांच्यात झाला.यात चेन्नई च्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

बेंगलोरच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघाकडून सलामीला ऋतुराज गायकवाड व रॉबिन उथापा फलंदाजीस आले. जोश हेझलवूडने चेन्नईच्या संघास पहिला धक्का दिला. जोशच्या गोलंदाजी वर ऋतुराज गायकवाड पायचीत झाला.ऋतुराज ने १६ चेंडूत ३ चौकार लगावत १७ धावा केल्या.

ऋतुराज नंतर मोईन अली फलंदाजीस आला.मोईन अली ८ चेंडूत ३ धावा करत धावचीत झाला. रॉबिन उथापाने दमदार फलंदाजी करत ५० चेंडूत ४ चौकार व ९ षटकारात ८८ धावा केल्या तर शिवम दुबे ने ४६ चेंडूत ५ चौकार व ८ षटकार झळकवत ९५ धावा केल्या. चेन्नईच्या संघाने २० षटकात ४ गडी बाद २१६ धावा केल्या.

चेन्नई ने दिलेल्या २१७ धावांचे आव्हान स्वीकरत बेंगलोरच्या संघाकडून कर्णधार फाफ डूप्लेसी व अनुज रावत सलामीला फलंदाजीसाठी मैदानात आले. डूप्लेसी ९ चेंडूत ८ धावांवर झेल बाद झाला. त्या नंतर विराट कोहली फलंदाजी साठी मैदानात आला.मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने विराट कोहलीला झेलबाद केले.

विराटने तीन चेंडूत अवघी एक धाव केली. अनुज रावत १६ चेंडूत १२ धावा करून पायचीत झाला. रवींद्र जडेजा ने ग्लेन मॅॅक्स्वेलला क्लीन बोल्ड केले.ग्लेनने ११ चेंडूत २६ धावा केल्या.सुयश प्रभुदेसाई ने १८ चेंडूत ३४ धावा करत महेश थीक्सानाच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. शाबाज अहमद २७ चेंडूत ४१ धावा करत क्लीन बोल्ड झाला.पाथोपाठ हसरंगा ७ धावा तर आकाश दीप शून्यावर बाद झाला. दिनेश कार्तिकने १४ चेंडूत २ चौकार व ३ षटकार लगावत ३४ धावा करत संघाची धाव संख्या वाढविण्याच्या प्रत्य्नात असताना अंबाती रायडूने त्याला झेल बाद केले. बेंगलोरचा संघ 20 षटकात ९ गडी बाद १९३ धाव संख्ये पर्यंत पोहचू शकला.

- Advertisment -

ताज्या बातम्या