IPL 2022 : आयपीएलच्या दोन नव्या संघांसाठी निविदा; बीसीसीआयला ५ हजार कोटींचा धनलाभ?

IPL 2022 : आयपीएलच्या दोन नव्या संघांसाठी निविदा; बीसीसीआयला ५ हजार कोटींचा धनलाभ?
आयपीएल

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानें (BCCI) इंडियन प्रीमिअर लीग 2022 साठी (IPL 2022) दोन नव्या संघांसाठी निविदा (Tender) मागवल्या आहेत. अदानी ग्रूप, संजीव गोएंका ग्रुप, टोरेंट फार्मा कंपनी यांची नावे चर्चेत आहेत आणि या टेंडरसाठी 5 सप्टेंबरपूर्वी अर्ज करावा लागणार आहे...

या मुदतीपूर्वी इच्छुकांना सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील, असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 2011 नंतर प्रथमच आयपीएलमध्ये दहा संघ खेळणार आहेत.

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने (IPL Governing Council) निविदा प्रक्रियेद्वारे बोली आमंत्रित केल्या आहेत. यात काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत.

पात्रता सिद्ध करणे, बोली सादर करण्याची प्रक्रिया, प्रस्तावित नवीन संघांचे अधिकार आणि दायित्वे इत्यादी घटक ङ्गनिविदा आमंत्रणफमध्ये समाविष्ट आहे, जे नॉन-रिफंडेबल शुल्काची भरपाई मिळाल्यावर उपलब्ध केले जातील. हे शुल्क 10 लाख रुपये इतके असेल. तसेच यात वस्तू आणि सेवा कराचाही समावेश आहे.

केवळ व्यक्ती किंवा ग्रुप निविदा खरेदी केल्यानंतर आयपीएल संघासाठी बोली लावण्यास पात्र होणार नाही. त्याला उर्वरित अटी आणि मापदंडांचे पालन करावे लागेल. कोणतेही कारण न देता कोणत्याही टप्प्यावर बोली प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे.

बीसीसीआयला किमान 5000 कोटींची अपेक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डाने एका संघाची मूळ किंमत सुमारे 2 हजार कोटी रुपये ठेवली आहे. अशा स्थितीत बीसीसीआयला या 2 संघांकडून सुमारे 5 हजार कोटी मिळू शकतात. पुढील हंगामापासून 60 ऐवजी 74 सामने खेळले जातील. यातून बीसीसीआयला किमान 5000 कोटींची अपेक्षा आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात 74 सामने होतील आणि प्रत्येकासाठी ही फायदेशीर गोष्ट आहे.

कोण आहेत शर्यतीत?

नवीन संघांसाठी अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे या शहरांची नावे समोर आली आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनऊमधील एकाना स्टेडियम ही फ्रेंचायझींची निवड असू शकते, कारण या स्टेडियमची क्षमता अधिक आहे. अनेक व्यावसायिक कंपन्या फ्रेंचायझी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. अदानी ग्रुप, आरपीजी संजीव गोएंका, फार्मास्युटिकल कंपनी टोरेंट आणि एक बँक हे सर्व आयपीएलमध्ये त्यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com