Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याIPL-2022 : बंगळुरूचा लखनौवर विजय

IPL-2022 : बंगळुरूचा लखनौवर विजय

कोलकाता | वृत्तसंस्था ( Kolkata)

कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर आयपीएल-२०२२ (IPL 2022) चा क्रिकेटचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅॅलेंंजर्स बंगलोर (Lucknow Super Giants Vs Royal Challengers Bangalore ) यांच्यात खेळण्यात आला. यात बेंगलोरच्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

लखनौच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेंगलोरच्या संघाकडून सलामीला विराट कोहली व फाफ डूप्लेसी फलंदाजीसाठी मैदानात आले. पहिल्या षटकातच फाफ डूप्लेसीला क्विंटन डी कॉकने शून्यावर झेल बाद करत बेंगलोरच्या संघास पहिला धक्का दिला. आवेश खानच्या गोलंदाजीवर मोहसीनखानने विराट कोहलीला झेल बाद केले. विराट कोहलीने २४ चेंडूत २५ धावा केल्या. ग्लेन मॅॅक्स्वेलने १० चेंडूत ९ धावा करत इव्हिन लुईस कडून झेल बाद झाला. महिपाल लोमरोरने ९ चेंडूत १४ धावा करत लोकेश राहुल कडून झेल बाद झाला. दिनेश कार्तिकने २३ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या तर रजत पाटीदारने आक्रमक फलंदाजी केली.रजतने ५३ चेंडूत ७ षटकार व १२ चौकार लगावत नाबाद एकूण १११ धावा केल्या. २० व्या षटका अखेर बेंगलोरच्या संघाने ४ गडी बाद २०७ धावा केल्या.

बेंगलोरच्या संघाने दिलेल्या २०८ धावांचे आव्हान स्वीकारत लखनौच्या संघाकडून प्रथम क्विंटन डी.कॉक व लोकेश राहुल फलंदाजीस आले. मोहमद सिराजच्या गोलंदाजीवर फाफ डूप्लेसीने क्विंटन डी.कॉकला पहिल्या षटकात झेल बाद करत ६ धावांवर तंबूत परत पाठविले. मनन वोहरा ११ धावांवर शाह बाज अहमद कडून झेल बाद झाला. व्ही. हसरंंगाने दीपक हुड्डाला क्लीन बोल्ड केले. दीपक हुड्डाने २६ चेंडूत ४५ धावा केल्या. रजत पाटीदारने मार्क्स स्टोइनिसने ९ धावांवर झेल बाद केले. कृणाल पंड्या शून्यावर माघारी परतला. लोकेश राहुलने ५८ चेंडूत ५ षटकार व ३ चौकार लगावत ७९ धावा केल्या.

लखनौ च्या संघाने २० व्या षटका अंती ६ गडी बाद १९३ धावा केल्या. बेंगलोरच्या संघाने लखनौच्या संघावर १४ धावांनी विजय मिळविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या