IPL-2022 : बंगळुरूचा लखनौवर विजय

IPL-2022 :  बंगळुरूचा लखनौवर विजय

मुंबई | प्रतिनिधी ( Mumbai )

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मैदानावर आयपीएल-२०२२ ( IPL-2022 ) चा क्रिकेटचा सामना रॉयल चॅॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स ( Royal Challengers Bangalore Vs Lucknow Super Giants )यांच्यात खेळला गेला. यात बेंगलोरच्या संघाने बाजी मारली.

लखनौच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेंगलोरच्या संघाकडून सलामीस अनुज रावत व फाफ डूप्लेसी फलंदाजीस मैदानात आले. द्श्मंथा चमिराच्या गोलंदाजीवर के एल राहुल ने अनुज रावतला झेल बाद केले. अनुज ने ५ चेंडूत ४ धावा करत तंबूत परतला. विराट कोहलीला दीपक हुड्डा ने झेलबाद करत शून्यावर माघारी पाठविले.

ग्लेन मॅॅक्स्वेल व डूप्लेसी यांची जोडी मैदानात असताना मॅॅक्स्वेलने धडाकेबाज फलंदाजीस सुरवात केली परंतु, कृणाल पंंड्याच्या गोलंदाजीवर जेसन होल्डरने मॅॅक्स्वेलला झेलबाद केले.मॅॅक्स्वेलने ११ चेंडूत २३ धावा केल्या.पाठोपाठ सुयश प्रभू देसाईला कुणाल पंड्या ने झेल बाद केले. प्रभुदेसाई ने ९ चेंडूत १० धावा केल्या . शाहबाज अहमदने २२ धावा तर दिनेश कार्तिकने १३ धावा केल्या .फाफ डूप्लेसीने धडाकेबाज फलंदाजी केली. डूप्लेसीने ६४ चेंडूत ११ चौकार व २ षटकार झळकवत ९६ धावा केल्या. २० व्या षटकाअखेरीस बेंगलोरच्या संघाने ६ गडी बाद १८१ धावा केल्या .

बेंगलोरच्या संघाने दिलेल्या १८२ धावांचे आव्हान स्वीकारत लखनौच्या संघाकडून केएल राहुल व डी कॉक फलंदाजीस मैदानात आले.ग्लेन मॅॅक्स्वेलने डी कॉकला ५ धावांवर झेलबाद करत माघारी पाठविले. मनीष पांडे ६ धावांवर झेलबाद होत माघारी परतला. मनीषला हर्षल पटेलने झेल बाद केले. मनीष नंतर कृणाल पंड्या फलंदाजीसाठी मैदानात आला.

कृणाल पंड्याने २८ चेंडूत ४२ धावा करत शाहबाज अहमद कडून झेलबाद झाला.मोहमद सिराज च्या गोलंदाजी वर सुयश प्रभूदेसाईने दीपक हुड्डा ला झेलबाद केले.दीपक हुड्डा ने १४ चेंडूत १३ धावा केल्या. आयुष बदोनी १३ चेंडूत १३ धावा करत दिनेश कार्तिक कडून झेल बाद होत तंबूत परतला. २० व्या षटका अखेरीस लखनौच्या संघाने ८ गडी बाद १६३ धावा केल्या. लखनौ संघाचा १४ धावांनी पराभव झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com