IPL-2022 : बंगळुरूचा चेन्नईवर विजय

IPL-2022 : बंगळुरूचा चेन्नईवर विजय

पुणे | प्रतिनिधी ( Pune )

पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आयपीएल-२०२२ ( IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅॅलेन्जर्स बेंगलोर ( Chennai Super Kings Vs Royal Challengers Bangalore ) यांच्यात खेळण्यात आला. यात बेंगलोरच्या संघाने बाजी मारली.

चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेंगलोरच्या संघाकडून सलामीला विराट कोहली व फाफ डूप्लेसी फलंदाजीस आले. सलामीच्या फलंदाजांंनी चांगली सुरवात केली. मोईन अलीच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाने फाफ डूप्लेसीला झेलबाद करत बेंगलोरच्या संघाला पहिला धक्का दिला. डूप्लेसी ने २२ चेंडूत ३८ धावा केल्या.ग्लेन मॅक्स्वेल अवघ्या ३ धावांवर धावचीत झाला.

दहाव्या षटकात सलामीवीर विराट कोहलीला मोईन अलीने क्लीन बोल्ड केले.विराट कोहलीने ३३ चेंडूत ३० धावा केल्या. रजत पाटीदारला मुकेश चौधरीने झेल बाद केले.रजतने १५ चेंडूत २१ धावा केल्या. महिपाल लोमरोरने २७ चेंडूत ४२ धावा करत ऋतुराज गायकवाड कडून झेल बाद झाला. व्ही. हसरंगाला ऋतुराज गायकवाडने झेल बाद करत शून्यावर माघारी पाठविले.२० व्या षटका अखेरीस बेंगलोरच्या संघाने ८ गडी बाद १७३ धावा केल्या.

चेन्नईच्या संघाकडून ऋतुराज गायकवाड व डेव्हन कोन्वे सलामीला फलंदाजीस आले. ऋतुराज गायकवाड व डेव्हन कोन्वेने धडाकेबाज फलंदाजीस सुरवात केली. सातव्या षटकात ऋतुराज गायकवाड २३ चेंडूत २८ धावा करत झेल बाद झाला. रॉबिन उथापा झेल बाद होत अवघ्या एक धावावर तंबूत परतला. ग्लेन मॅॅक्स्वेल अंबाती रायडूला क्लीन बोल्ड करत १० धावांवर माघारी पाठविले.

व्ही हसरंगाच्या गोलंदाजीवर डेव्हन कोन्वेला शाहबाज अहमदने झेल बाद केले. डेव्हन कोन्वेने ३७ चेंडूत २ षटकार व ६ चौकार लगावत अर्धशतक पूर्ण करत एकून ५६ धावा केल्या. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने रविंद जडेजाला झेल बाद केले.रविंद जडेजा ने अवघ्या तीन धावा केल्या.महेंद्रसिंह धोनी अवघ्या २ धावांवर झेलबाद होत तंबूत परतला.ड्वेन प्रिटोरियसला विराट कोहलीने १३ धावांवर झेलबाद केले.

२० व्या षटकाअखेर चेन्नईचा संघ ८ गडी बाद १६० धावा करू शकला. बेंगलोरच्या संघाचा १३ धावांनी विजय झाला.

Related Stories

No stories found.