Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याIPL-2021 : चेन्नईला चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद

IPL-2021 : चेन्नईला चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद

दुबई | वृत्तसंस्था

IPL 2021 च्या आज झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने बाजी मारली . चेन्नई चा संघ IPL-2021 चा विजेता ठरला

- Advertisement -

कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईकडून सलामीला ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांची जोडी मैदानात आली. सलामीच्या खेळाडूंनी कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला . फिरकीपटू सुनील नरिनने ऋतुराज गायकवाड ला ३२ धावांवर माघारी पाठवत चेन्नई च्या संघास पहिला धक्का दिला.

ऋतुराज गायकवाड गायकवाड नंतर रॉबिन उथप्पा मैदानात आला .ऋतुराज व डु प्लेसिस यांनी चांगली भागीदारी केली. दहाव्या षटका पर्यंत चेन्नई च्या संघाने ८० धावांची मजल मारली.त्यानंतर बाराव्या षटकात चेन्नई च्या संघाने शंभरी पार केली. कोलकाताच्या नरिनने उथप्पाला पायचीत करीत माघारी पाठविले. उथप्पाने १५ चेंडूत ३ षटकारांसह ३१ धावा केल्या.

उथप्पानंतर बाद झाल्या नंतर मोईन अली मैदानात आला . फाफ डु प्लेसिस ला मोईन अली ने चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. मोईन अली ने नाबाद तीन षटकार लगावत ३७ धावा केल्या .. शेवटच्या चेंडूवर डु प्लेसिस झेलबाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८६ धावा केल्या. चेन्नई च्या संघाने कोलकाताच्या संघास १९३ धावांचे आव्हान दिले.

कोलकाता संघाकडून शुभमन गिल व वेंकटेश अय्यर सलामीला आले. कोलकाताच्या संघानेही फलंदाजी ची दमदार सुरवात केली. १०व्या षटकात व्यंकटेश अय्यरने ३१ चेंडूत आपले अर्धशतक करीत माघारी परतला . अय्यरनंतर मैदानात आलेल्या नितीश राणाही एकही धाव न घेता ही माघारी परतला ११ षटकात कोलकाताने २ बाद ९३ धावा केल्या.

राणानंतर सुनील नारायण मैदानात आला. जोश हेझलवूडने च्या गोलंदाजी वर रविंद जडेजाने सुनील नारायणला झेलचीत करीत अवघ्या दोन धावांवर तंबूत धाडले . सुनील नारायण नंतर कप्तान मॉर्गन मैदानात आला. तेराव्या षटका अखेर कोलकाताची धाव संख्या १०८ धावांवर ३ गाडी बाद अशी झाली.

दीपक चाहर नी शुभमन गिलला पायचीत करीत कोलकाताला चौथा धक्का दिला . शुभमन ने ४३ चेंडूंत ५१ धावा केल्या . शुभमन नंतर दिनेश कार्तिक ही नऊ धाव संख्येवर बाद झाला .त्या पाठोपाठ शकीब हसन ही माघारी परतला . राहुल त्रिपाठीही दोन धावा करीत तंबूत परतला कोलकाता संघाच्या खेळाडूंची बाद होण्याची मालिका सुरुच राहिली .सोळाव्या षटका अखेर १२३ धाव संख्येवर ७ बाद अशी स्थिती कोलकाता संघाची झाली. कप्तान मॉर्गनही १७व्या षटकात झेलबाद झाला.

कोलकाताचा संघ चेन्नईचे आव्हान स्वीकारू शकला नाही . अखेर १६५ धावा ९ गडी बाद संख्ये पर्यंतच कोलकाताचा संघ पोहचू शकला.

- Advertisment -

ताज्या बातम्या